जव्हारमध्ये श्रमजीवी संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्धटान
- Navnath Yewale
- Jul 30, 2025
- 1 min read

जव्हार ; श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज जव्हार तालुक्यात जनसंपर्क कार्यालयाचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी व कामगार वर्गाच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जाणार असून, संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, श्रमजीवी संघटना तालुका अध्यक्ष अजित गायकवाड , जमशेद खान जव्हार शहर अध्यक्ष, संतोष धिंडा तालुका सचिव, तालुका उपाध्यक्ष परशुराम गांगोडा, सुनील हिरकुडा तालुका उपाध्यक्ष, रामदास डांगटे तालुका उपाध्यक्ष, रघुनाथ चौधरी गोविंद गावित, रोहिदास दांडेकर, उमेश वाळू नितीन पढेर, सुभाष दिघा,रंजना चौधरी , सुरेखा टोपले तुळशीराम डोंबे, ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांमध्ये निलेश भसरा ,रवी पढेर, कमलाकर वाघ जव्हार तालुक्यातील कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे वरिष्ठ नेते यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी कार्याची माहिती देताना, जनतेच्या हक्कासाठी आणि शोषित-वंचितांच्या न्यायासाठी लढा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, गावपातळीवरील प्रतिनिधी आणि महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिकांना मदत, मार्गदर्शन आणि संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या नवीन कार्यालयामुळे जव्हार तालुक्यातील श्रमिक, आदिवासी व गरीब वर्गासाठी एक प्रभावी आवाज मिळणार आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
जव्हार तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विविध सरकारी योजना विविध समस्यांचे निवारण करण्यात येईल आदिवासी गोरगरीब जनतेला या जनसंपर्क कार्यालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल
अजित गायकवाड श्रमजीवी संघटना तालुकाध्यक्ष जव्हार



Comments