...तर आरसीबीचे स्पप्न भंग होऊ शकते, प्रीती झिंटाची पंजाब किंग्ज बनणार आयपीएल चॅम्पियन!
- Navnath Yewale
- Jun 2
- 1 min read

आयपीएल 2025 मध्ये पहिल्यादाच चॅम्पियन होण्याच्या मार्गावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी) ला बीसीसीआयच्या नवन नियमामुळे मोठी अडचण येऊ शकते. गेल्या 17 हंगामात जेतेपद जिंकण्यात अपयशी ठरलेल्या आरसीबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण जर शेवटच्या दिवशी पावसामुळे सामना रद्द झाला तर आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंग होऊ शकते.
पंजाब किंग्जचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकून अंतिम फेरीत पोहोचले आहे. अंतिम सामना आरसीबी आणि पंजाब यांच्यात होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर आरसीबीला नुकसान सहन करावे लागेल. दुसरीकडे, टेबल टॉपर असल्याने राखीव दिवस जाहीर केलेला नाही. याशिवाय राखीव दिवस असण्याची अपेक्षा आहे.
बीसीसआय ने अद्याप आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस जाहिर केलेला नाही. पण शक्यता अजूनही कायम आहे. जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांना आयसीसीप्रमाणे संयुक्त विजेते घोषित केले जाणार नाही. त्या ऐवजी पॉइंट टेबलमध्ये सर्वात वरती असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. या बाबतीत, पहिल्या स्थानावर असलेला पंजाब किंग्ज आयपीएल 2025 चा चॅम्पियन बनू शकतो.
Comments