top of page

घरी परतताच बनली डिएसपी, वर्ल्ड कप विनर खेळाडूला मुख्यमंत्र्यांनी दिलं नियुक्ती पत्र; रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव

ree

मागच्या रविवारी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या वर्ल्डकप विन खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी परतल्या आहेत. या दरम्यान ज्या राज्यातून या क्रिकेटपटू येतात त्या राज्यांकउून या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एका महिला खेळाडूला उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नियुक्ती पत्रही दिले आहे.


भारताची वर्ल्डकप विनर स्आर विकेटकीपर- फलंदाज रिचा घोष हिला पश्चिम बंगाल पोलिसात उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी क्रिकेट आसोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) च्या सत्कार समारंभात तिला स्वत: नियुक्ती पत्र दिले. भारतीय महिला संघाच्या अलिकडच्या विश्वचषक विजयात रिचाने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच तिला डिएसपीपदी नियुक्त करण्यात आले आहे.


पश्चिम बंगाल सरकारने रिचा घोषला “ बंगभूषण” पुरस्कारोन सन्मानित केले. तसेच राज्य सरकारने तिला सोन्याची साखळी देखील प्रदान केली. सीएबीकडून तिला सोन्याची बॅट आणि सोन्याचा चेंडू प्रदान केला आहे. याशिवाय रिचाला 3.4 दशलक्ष (34 लाख रुपये) रोख बक्षीस देण्यात आले आहे. रिचाला ही रक्कम देण्यात आली कारण तिने विश्वचषक अंतिम समान्यात इतक्या धावा केल्या होत्या, ज्या भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या.


दरम्यान भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्या दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले. रिचा घोषने जेतेपदाच्या सामन्यात 34 धावा केल्या, ज्यामुळे भारताला एकून 300 च्या जवळपास धावसंख्या गाठता आली.


हे खेळाडू डिएसपी बनले: रिचा घोषच्या आधी, अष्टपैलू दीप्ती शर्माची या वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसात डिएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्तीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला. गेल्या ऑक्टोबरमध्ये, भारतीय पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील तेलंगणा पोलिसात डिएसपी झाला.


22 वर्षीय रिचा घोषने भारतीय महिला संघासाठी दोन कसोटी,51 एकदिवसीय आणि 67 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात रिचाने कसोटी क्रिकेटमध्ये 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.


रिचा घोषने महिला एकदिवसीय समान्यांमध्ये 29.35 च्या सरासरीने 1145 धावा केल्या आहेत. तिने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सात अर्धशतके झळकावली आहेत. टी 20 आंतरराष्ट्रीय सामान्यांमध्ये तिने 27.35 च्या सरासरीने 1067 धावा आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

Comments


bottom of page