top of page

..तुमच्या बापानं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला - हाके

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका; माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप


सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करत माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यावरून लक्ष्मण हाके यांनी तुझ्या बापाने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय जरांगे पाटलाच्या जातीला आरक्षण मिळाले तर ओबीमधील मायक्रो ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचं काय होईल, बलुते-आलुते, भटके विमुक्त जाती-जमाती या मराठा समाजाच्या स्पर्धेत टिकतील का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.


खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेवून आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यातच आता लक्ष्मण हाके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीका करत माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हाके म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या सोलापुरच्या खासदार प्रणितीताई शिंदे जरांगेंना भेटायला गेल्या, राजकारण करतायत खासदारकी भोगतायत. कोणाच्या जीवावार तर सोलापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य भटक्या विमुक्त जाती -जमातींच्या जीवावर. तुम्ही मनोज जरांगेंना पाठींबा दिला, पाठींबा देत अतसाना मनोज जरांगेंची काय मागणी आहे , यावर तुम्ही विचार नाही केला प्रणिती ताई, जर मनोज जरांगे म्हणत आसेल आम्हला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. आणि तो आंदोलन उभं करत असेल, तर तुम्ही त्याला पाठिंबा द्यायला गेलात. प्रणिती ताई शिंदे तुम्ही आणि तुमच्या बापानं ज्यावेळेस सुशिलकुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.


त्यावेळी त्यांनी एक जीआर काढला 2004/05 च्या दरम्यान कुणबी आणि मराठा एकच समजण्यात यावं, कुणब्यांना ओबीसीमध्ये सामावून घेतलं होतं. पण मराठा -कुणबी आणि कुणबी- मराठा एक समजण्यात यावा, या तुमच्या एकच मोमेंट रिझर्वेशनद्वारे मागासवर्गीयांच्या जे सामाजीकदृष्ट्या बलुता- आलुता भटक्या विमुक्त जाती -जमातीमधल्या या सर्व ओबीसीमल्या सामाजिक मागासांचं ओबीसीचं रिझर्वेशन हे या सुशिलकुमार शिंदेच्या जीआरद्वारे मोडीत निघालं. या ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्धवस्त करण्याचं काम या सुशिलकुमार शिंदेच्या 2004/05 मधल्या गव्हरमेंट रिझर्वेशनने केलं. प्रणिती ताई शिंदे तुमच्या बापानं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मनोज जरांगे सारख्या जातीयवादी माणसाला तुम्ही भेटायला गेलात.


जर जरांगेच्या जातीला ओबीसी म्हणून आरक्षण दिलं तर मुळ ओबीसमधला सामाजीकदृष्ट्या मागास आहे जो बलुता- आलुता आहे. जो जन्मानं मागच्या शेदोनशे वर्षामध्ये त्याच्यावरती सोशल डिस्क्रिमीनेशन झालंय त्या माणसांच्या प्रतिनिधित्वाचं काय होईल. जे बलुते- आलुते भटक्या विमुक्त जाती-जमाती या मराठा समाजाच्या स्पर्धेत टिकतील का? हा विचार प्रणितीताई शिंदे तुम्ही नाही केला. तुमच्या बापानं नाही केला. आणि आत्ता परत तुम्ही मनोज जरांगेना पाठींबा द्यायला गेलात. निषेध व्यक्त करतोय तुमच्या या कृत्याचा, कारण तुम्ही ज्या सोलापुर मतदार संघातून निवडणून येतात त्या मतदारसंघामध्ये भटक्या विमुक्त जाती- जमाती, ओबीसींच किती मतदान आहे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. ओबीसी मरो आणि आमचं राजकारण जगो या न्यायाने तुम्ही जर वागणार असाल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम सोलापुर मतदारसंघामध्ये करण्यात येईल असा इशारा देत हाके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना डिवचत माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Comments


bottom of page