पंकज देशमुख हत्या प्रकरण; सुनीता देशमुखांनी पोलिस अधिक्षकांना दिली संशयितांची नावे
- Navnath Yewale
- Jul 22
- 2 min read
भाजप आमदार संजय कुटेंच्या पीएचा सहभाग, तीन पोलिसांचीही तक्रार

जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा ड्रायव्हर पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलिस अधिक्षकांना दिली आहेत. त्यामध्ये आमदार संयज कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश वर्माचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणातील संशयितांना मदत करणार्या तीन पोलिसांची यादीही सुनीता देशमुखांनी पोलिस अधिक्षकांना दिली आहे. यावर आता पोलिस अधिक्षकांना दिली आहे.
जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संयज कुटे यांचे निकटवर्तीय ड्रायव्हर पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह अढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र, पंकज देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आहे.
संशयितांची नावे दिली:
सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पालिस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयतांची नावे दिली या प्रकरणात संशयितांना मदत करणार्या तीन पोलिस अधिकार्यांची नावेही त्यांनी अधीक्षकांकडे दिली आहेत. ज्यामध्ये निलेश शर्मा ( आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक), गजानन सरोदे ( आमदार संजय कुटे यांचा निकटवर्तीय नातेवाईक), परीक्षित ठाकरे (कंत्राटदार) यांचा समावेश आहे या संपूर्ण प्रकरणात संशयितांना मदत करणार्या पोलिस अधिकार्यांचीही नावे सुनीता देशमुख यांनी दिली आहे ज्यामध्ये श्रीकांत निचळ( पोलिस निरिक्षक, जळगाव जामोद), अमोल पंडित (पोलिस उपनिरिक्षक), सचिन राजपूत ( गोपनिय विभाग कर्मचारी) यांचा समावेश आहे. सुनीता देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आणि जाहिर केलेल्या संशयितांच्या नावामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अद्यापही पतासाची मागणी मान्य नाही:
मयत पंकज देशमुखांच्या पत्नी सुनीता देशमुख म्हणाल्या की, “या प्रकरणाचा सीआयडी तपास करावा अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. या संबंधित आठ-नऊ निवेदन देऊनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या हत्येला तीन महिने होऊन गेले. पण पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला हे जाहीर केलं नाही.”



Comments