top of page

पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी !



राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थीक मदत जाहिर करण्यात आली आहे. त्याशिवाय, सरार पिडीत कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असल्याचंही राज्य सरकारने सांगितलं आहे. त्याशिवाय, असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


राज्य सरकारचं कौतुक !

पहगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. सरकारच्या या निर्णयाने पिडीतक कुटुंबीयांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.


महाराष्ट्रातील मृतांची नावे

अतुल सावे-डोंबिवली, संजय लेले- डोंबिवली, हेमंत जोशी - डोंबिवली, संतोष जगदाळे - पुणे, कौस्तुब गणबोटे- पुणे, दिलीप देसले - पनवेल


पिडीत कुटुंबीयांना सरकारी नौकरी

पिडीत कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात आला आहे. राज्यसरकारकडून यासंदर्भात मदत देण्यात येत आहे. 50 लाखांचं अर्थसहाय्य सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षण आणि रोजगारात अडचण येऊ नये, याचीही खात्री करण्यात आली आहे.


आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा

या हल्ल्यात संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोरच त्यांना गोळ्या घातल्या. याचा मोठा धक्का त्यांच्या कुटुंबाला बसला आहे. सरकारने संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आसावरी जगदाळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे आमच्या कुटुंबाला आधार मिळेल, असं त्या म्हणाल्या. तसेच आसावरी जगदाळे यांनी सरकारी सुरक्षेचेही मागणी केली आहे. या हल्ल्यातून सावरायला आम्हाला वेळ लागतोय, थोडाही आवाज झाला तरी आम्हाला घाबरायला होतं. त्यामुळे सरकारने काही दिवस आम्हाला सुरक्षा द्यावी अशी मागणी आसावरी जगदाळे यांनी केली आहे.

Comments


bottom of page