top of page

बीडमधील ‘सॅफोलाइट’ नव्या पॅटर्नची राज्यातील भेसळ माफियांसाठी धोक्याची घंटा !

दुध भेसळीवर फास आवळला; भेसळ माफियांची आता गय नाही, बनावट खवा कारखान्यावरील छापेमारीला संशयाची झालर?

बीड: आयएएस तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून राज्यभरातील भेसळ, तेल आणि गुटखा माफियांविरोधातील कारवाईने मोठा वेग घेतला आहे. त्यांच्या आक्रम कारवाईमुळे राज्यातील अन्न नमुणा तपासणीत तब्बल 467 टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, इतक्या कठोर मोहिमेनंतर भेसळखोरांनी हार मानलेली नसल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील भेसळखोरांनी दुग्धजन्य पदार्थांमध्ये थेट औद्योगिक रसायनांचा वापर केल्यवाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे राज्यभारात खळबळ उडाली आहे. खवा आणि पनीरसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मानवी आरोग्यास घातक ठरणार्‍या ‘सॅफोलाइट’ या रसायनाची भेसळ केल्याचे तपासात समोर आले आहे.


तुकाराम मुंडे या नावाचे राज्यातील भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाचे पथक कुठेही पोहोचले की, “ तुकाराम मुंडे आले” अशी चर्चा बाजारात सुरू होते. बीडमध्ये याच धास्तीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर परिणाम झाला होता. काही काळ लग्नसमारंभासह विविध कार्यक्रमांतून पनीर अक्षरश: गायब झाले होते. तर शुद्ध खवा आणि पनीरचे दरही अचानक वाढले होते.


मात्र काही दिवसांतच भेसळ माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे आता उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी बीड जिल्ह्यात शिरुर कासार तालुक्यातील दहिवंडी शिवारात टाकलेल्या छाप्यात मोठा भेसळीचा प्रकार समोर आला. दहिवंडी येथील श्री कृष्ण केक अँड बर्फी या उत्पादक केंद्रावर कारवाईदरम्यान खवा आणि त्यापासून बनवण्यात येणारे खाद्य पदार्थ अधिक चमकदार दिसावेत यासाठी घातक सॅफोलाइट मिसळले जात असल्याचे तपासात आढळून आले.


या कारवाईत शेकडो किलो भेसळयुक्त खवा व त्यापासून तयार करण्यात आलेले बर्फी, मिल्क केक आणि इतर खाद्य पदार्थ नष्ट करण्यात आले. संबंधित व्यावसायिक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार शिरुर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, तपासणीत जप्त करण्यात आलेली मिठाई आणि कच्चा मालाचा साठा निकृष्ट, असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच अयोग्य आणि अस्वच्छ साठवणुकीमुळे हा माल घटनास्थळीच खोल खड्डा करून नष्ट करण्यात आला असून उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.


काय आहे सॅफोलाइट? : सॅफोलाइट, ज्याला रासायनिक भोषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सिलेट किंवा रॉन्गालाइट म्हटले जाते,हे अत्यंत शक्तिशाली औद्योगिक रसायन आहे. याचा वापर प्रामुख्याने टेक्साटाईल उद्योगात कपड्यांना रंग देण्यासाठी छपाईसाठी कापडावरील अतिरिक्त रंग काढण्यासाठी केला जातो. असे रसायन खाद्यपदार्थांमध्ये वापरल्यास ते मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. बीडमधील हा प्रकार आता राज्यातील भेसळ माफियांच्या नव्या पॅटर्नची धोकादायक घंटा मानला जात आहे.


एफडीए च्या अस्तित्वाची जानिव ? : आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्ताची सुत्रे हाती घेताच राज्यभरता भेसळयुक्त दुध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्य पदार्थांसह प्रतिबंधीत गुटखा, पानमसाल्यांच्या उत्पादक, अस्थापनांवर छापे मारीचा धडाका सुरू आहे. गेल्या कित्तेक वर्षात प्रशासनाचा ‘एफडीए’ विभाग अस्तित्वात आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना होता. प्रत्यक्षात सामान्य नागरिकांचे या विभागाकडे काडीचेही काम नसल्याने त्या बाबत साध्या चौकशीचा प्रश्नच उरत नाही, तर या विभागाच्या जबादार्‍या, कर्तव्याच्या माहितीपूसन अनभिज्ञ असलेल्या शिरुरकासार तालुक्यातील नागरिकांना किमान या कारवाईमुळे एफडीए विभाग अस्तित्वात आहे आणि त्याच्या जबादार्‍या नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी खाद्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालणे, प्रतिबंधीत गुटखा, दुध व त्यापासून निर्मित खाद्य पदार्थांमधील भेसळ, डब्ल्यूएचओ च्या मान्यताप्राप्त विविध औषधींच विक्रेत्यांकडून विक्री व्हावीत, यासाठीचे विविध कर्तव्य एफडीएचे असल्याची जानिव शिरुरकरांना या कारवाईतून झाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.


पोलिसांमुळेच दहिवंडीत भेसळयुक्त खवा कारखान्यावर छापा: बीड एफडीएचे अधिकारी मागील दिड महिन्यापासून शिरुर कासार शहरात फेर्‍या मारत होते. खवा कारखान्यावर छापेमारीच्या आठवडभरा पूर्वी शहरातील एका कुल्फी उत्पादक कारखान्यात नमुने घेतले होते. त्यापूर्वी एफडीए चे अधिकारी शिरुरमध्ये आल्याची साधी माहितीही मिळाली नाही. दहिवंडी शिवारात गेल्या वर्षभरापासून भेसळयुक्त खवा कारखाना सुरू होता,असी दबक्या आवाजात चर्चा आहे. प्रत्यक्षात मागील वर्षभरापासून एफडीएला याची भनकही नसावी? शिवाय बुधवारी (दि.1) पोलिस निरिक्षक राजेश गडवे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कारखान्यावर छापा टाकून पुढील उचित कारवाईसाठी रात्री 10:00 वाजेच्या सुमारास एफडीए च्या अधिकार्‍यांशी संपर्क करून घटनास्थळावर पाचारण केले. वर्षभरानंतर का होईना किमान शिरुर पोलिसांच्या सजकतेमुळे भेसळयुक्त खवा कारखान्याचा भांडाफोड झाला.


एफडीएची कारवाईच संशयास्पद: छापेमारीमध्ये जप्त केलेला खवा, बर्फी, मिल्क केक यासह खवा तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्यांची मोजदात करण्यासाठी कसल्याही प्रकारच्या उपकरणांचा वापर करण्यात आला नाही, शिवाय ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीच्या सांगण्यावरूनच जप्त मालाची नोंद करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे याच कारखान्यातील भेसळयुक्त उत्पादने शिरुर शहरातील संशयित मिठाई दुकानात वितरीत करण्यात येत होते. एफडीएच्या अधिकार्‍यांना छापेमारीची कारवाई सुरू असताना याची माहिती होती. मात्र, छापेमारीसोबतच संशयित मिठाई दुकानातील नमुने घेवून प्रयोगशाळेत पाठवणे अत्यावश्यक असताना एफडीएच्या अधिकार्‍यांनी जानिवपूर्वक शुक्रवारी (दि.3) सायंकाळी 4 :00 वाजेच्या दरम्यान संशयित मिठाई दुकानातील जवळपास 17 नमुने घेतले. एफडीएच्या अधिकार्‍यांनी संशयित मिठाई दुकानातील नमुने घेण्यास तीन दिवसांचा विलंब केवळ भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठीच केला? असा आरोप संतप्त नागरिकांतून केला जात आहे.

 
 
 

Comments


bottom of page