भाजपशासित राज्यात राहुल गांधीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

उत्तराखंड मधील हलद्वानीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानातील शुद्धीकरण हवनला दलित विरोधी म्हटलं होतं. यावरून अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करत अमित कुमार नावाच्या तरुणाने राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानात शुद्धीकरण हवन आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याकृत्याला गुन्हा संबोधत, हे कृत्या संपूर्ण भारतात दलितांना सामोरे जाव्या लागणार्या अस्पृश्यतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं. शिवाय या प्रकरणावरून त्यांनी भाजप आरएसएसची मानसिकताव उघड होत असंही म्हटलं होतं.
दरम्यान, या विधीसाठी जबाबदार असलेल्यांवर एसी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता राहुल गांधी यांच्याच विरोधात हलद्वानी येथील रहीवासी अमित कुमार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ते वाल्मिकी समजाचे सदस्य असून त्यांनी इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांसह 11 ऑगस्ट रोजी हलद्वानी येथील रामलीला मैदानात आयोजित स्वच्छता मोहिम आणि धार्मिक विधिमध्ये भाग घेतला होता. रामलीला मैदानातील कृत्याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा जातीशी संबंध नव्हता, असं असूनही, राहूल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत, कोणतीही शहानिशा न करता, यालाव अस्पृश्यता आणि अनुसूचित जातीविरुद्धचा गुन्हा म्हटलं आणि या विधीमध्ये सहभागी झालेल्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली, असा दावा कुमार यांनी केला आहे.
तसंच आपण स्वत: वाल्मिकी समाजाचे असूनही, त्यांची प्रतिमा अस्पृश्यता पाळणारे आणि दलित विरोधी अशी तयार करण्यात आली आहे. गांधी यांच्या आरोपांमुळे विविध समाजांमध्ये शत्रुत्व आणि तणाव वाढल्याचा दावाही कुमार यांनी केला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



Comments