मध्यरात्री पुण्याला हदरवणारं कांड; बाईकवर महिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटवलं अन...
- Navnath Yewale
- May 6, 2025
- 1 min read

शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर मध्यरात्री बाईकवर चक्क महिलेचा मृतदेह घेऊन फिरताणाच्या घटनेने पुणं शहर हादरलं आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं मध्यरात्री दिडच्या सुमारास एक तरुण बाईकवर माहिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं. त्याची विचारपूस केली असता पुण्याला हदरवणारं हत्याकांड समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
राकेश रामनाय निसार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मध्यरात्री दिड च्या सुमारास आरोपी राकेश एका महिलेचा मृदेह दुचाकीवर समोर घेऊन फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, संबंधित मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हे तर त्याच्याच पत्नीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. बबीता राकेश निसार असं मयत पत्नीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा आरोपी राकेश याने पत्नी बबीताचा गळा दाबून हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरुन प्रवास करत होता. तो पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदीराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
मध्यरात्री दिड वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीनं पत्नीची हत्या नेमकी का केली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आूसून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. मात्र, पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात अशाप्रकारे तरुण करत आहेत. मात्र, पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात अशाप्रकारे तरुण दुचाकीवर बायकोचा मृतदेही घेऊन फिरत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.



Comments