top of page

मराठवाडा अतिवृष्टी: पालकमंत्र्यांना ग्राऊंडवर उतरण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचना,अतिवृृष्टीसाठी मतदत जाहिर

ree

महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या 17 तुकड्या कार्यरत आहेत. याशिवाय शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकर्‍यांना 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.

ree

फडणवीस म्हणाले, अद्याप पंचनाम्याचे काम थांबवलेले नाही. नवनव्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तिथे पंचनामे करून मदत केली जाईल. एखाद्या जिल्ह्यात आता कमी मदत दिसत असेल तरी उर्वरित शेतकर्‍यांना मदत मिळेल शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळावी हा उद्देश आहे. घर, जमीन याबाबत नुकसानीची भरपाई देण्योच अधिकार जिल्हा अधिकार्‍यांना दिले आहेत. पैशांची कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहोत.

ree

दरम्यान कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याचा आढावा आम्ही घेतला आहे. पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना पूरग्रस्त भागात भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वत: काही भागात जाणार आहे. पण मतदकार्यावर ताण येणार नाही असा आमचा प्रयत्न असेले. परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत करता येईल, उद्ध्वस्त होणार्‍या शेतकर्‍याला अधिकचा दिलासा कसा देता येईल याचा प्रयत्न केला जाईल, असे अश्वासन योवळी फडणवीस यांनी दिले.


ओला दुष्काळ जाहिर करणार का?

ओला दुष्काळ सोड, या ठिकाणी जे काही नुकसान झाले त्या करीता नियमात जी आहे ती मदत देऊ असे म्हणत दुष्काळ जाहिर करण्याच्या विषयाला फडणवीस यांनी पद्धतशीरपणे बगल दिली. शिवाय एनडीआरएफच्या अंतर्गत आगाऊ रक्कम आपल्याला दिलेली असते. त्यानंतर आपल्याला काही मदत केंद्राकडून मिळते. पण तोपर्यंत राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे अश्वासनही त्यांनी दिले.

Comments


bottom of page