मराठवाड्यात आभाळ फाटलं...
- Navnath Yewale
- Sep 22
- 2 min read
नदी, नाल्यांना महापूर, पीकांसह शेती खरडून गेली, शेकडो नागरिकांचे एनडीआरएफ जवानांकडून रेस्क्यू

मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्याला यंदा पावसाने झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 29 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिरुर कासार भागात छगफुटीसदृष्य पाऊ झला, ज्यामुळे हजारो हेक्टर जमिन शेतीपीकांसह खरडून गेली. घरांसह बाजारपेठांत पाणी शिरले. सिंदफणा नदीला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा संपर्क तुटला. माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आणि 62 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील लाखी गावात लोकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला. पुराच्या पाण्यात आडकलेल्या नागरीकांना हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवण्यात आले. परंडा तालुक्यातील देवगावमध्ये लष्कराच्या जवानांनी बोटीने चोवीस लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पुराचे पाणी शिरल्याने दावणीलाच शेकडो गाई, म्हशींसह जनावरांचा तडफडून मृत्यू झाला तर कित्तेक जनावरं वाहून गेले.

शेतकर्यांचे जालन्यातही अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. वाघोळा गावात एका गर्भवती महिलेला खांद्यावर उचलून दवाखान्यात नेण्यात आले. शेतीत गाळ साचला असून सोयाबीन आणि तुर, कापुस यासह शेतीपीके वाहून गेली आहेत. एका नागरिकाने शासनाला विनंती केली, “ आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की माझं घर पण हे आहे का आहे, माझा सगळा संससार ह्यात आता सध्या पाण्यात आले मी कपड्यांनी बसाबसा बाहेर निघालेला आहे. फक्त शासनाला एवढीच विनंती की, आमच्या गरिकांचे घरं उभारावीत आणि आम्हाला काहीतरी मदत मिळावी” दरम्यान नऊशे पेक्षा अधिक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार तालुक्यात सिंदफणा, किन्हा, उथळा, या प्रमुख नद्यांना तर पाटोदा तालुक्यात मांजरा नदीच्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शिरुर कासार तालुक्यात सवसवाडी, वडाळी, चाहूरवाडी गावात पाणी शिरले, शिवार पाण्याखाली गेला पुराच्या पाण्याने पीकांसह शेती खरडून गेला दुपारपर्यंत बहूतांश नागरिकांचा संपर्क तुटलेला होता. शिरापुर गात येथे सिंदफणा नदीच्या पुरामुळे 28 नागरिक शेतातल वस्तीवर पुराच्या पाण्यात आडकले होते. आमदार संदिप क्षिरसागर यांनी तात्काळ एनडीआरएफच्या टीमसह शिरापुर गात येथे दाखल झाले. बोटींच्यासाह्याने पुराच्या पाण्यात आडकलेल्या नागरिकांचे रस्क्यू करण्यात आले. यामध्ये छोट्या बाळासह एक महिलेचाही समावेश होता. आमदार क्षिरसागर यांनी स्वत: कार्यकर्त्यांसह बचावकार्यात सहभागी होवून पुराच्या पाण्यात आडकलेल्या नागरिकांना वाचवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.



Comments