top of page

मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा!

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 45.3 मिमी तर हिंगोलीत 27.4 मिमी पावसाची नोंद ; शेतीपीके भूईसपाट, पुढील तीन दिवस हवामान खात्याचा अलर्ट

ree

मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे नियमित 18 दरवाजासह आपत्कालीन नऊ दरवाजे असे एकून 27 दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात एक लाख 15 हजार क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. दुपारी धरणाचे आपत्कालीन दरवाजे बंद करण्यात आले. धरणात एक लाख क्यूसेसपेक्षा जास्त आवक होत आहे. त्यामुळे विसर्ग दीड लाखापेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.


मराठवाड्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याच इशारा भारतीय हवामाशास्त्र विभागाने दिला आहे . छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे विभागातील 33 महसूल मंडळांत अजिवृष्टी झाली आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. गोदाकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


मराठवाड्याला सप्टेंबरच्या मध्यातही अतिवृष्टीचा तडाखा कायम आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र, अतिवृष्टीने शेतीपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी सकाळी साडे आठर्पंत 33 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर, पिंपळवाडी, बालानगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, विहामांडवा, मंडळात अतिवृष्टी झाली आहे.


जालना जिल्ह्यातील गोंदी, सुकापूरी, तिर्थापूरी, कुंभार पिंपळगाव, आंतरवाली मंडळात. बीड जिल्ह्यातील राजुरी, धोंडराई, उमापूर, रेवकी, तलवाडा, पिंपळगाव, आष्टी, कडा, दौलावडगाव, शिरुर कासार, जाटनांदूर, मानूर, ब्रम्हनाथ येळंब मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यात लातूर, किनी, कणेरी, उदगीर, नालगलगाव, मोघा, तोंडार आणि धाराशिव जिल्ह्यातील परंडा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी, कुंडवाड आणि हिंगोली जिल्ह्यातील अंबा मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशानाने दिली आह . छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 26.6 मिमी,जलना 25.1, बीड 45.3 लातूर 25.7, धाराशिव 20.2,नांदेड 13.6, परभणी 16.7 आणि हिंगोली 27.4 अशी जिल्हानिहाय पावसाच्या सरासरीची नोंद झाली आहे. कमी पाणीसाठा असलेल्या धरणात मुसळधार पावसानंतर पाण्याचा ओघ सुरू आहे. विभागातील मोठी धरणे जवळपास पूर्ण भरलेली आहेत. मध्यम आणि लघु प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास विभागातील सर्व धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page