महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञाणेश्वरी मुंडेंचे पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Jul 23
- 2 min read

महादावे मुुंडे खून प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शवविच्छेदन अहवालात नमुद माहितीने विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचे दाव्यांना बळ मिळत आहे. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पुन्हा आज जरांगे पाटलांची भेट घेत आरोपींची नावे सांगितली आहेत. बळा बांगर यांनी पत्रकारपरिषदेद्वारे महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येचे फोटो दाखवत आरोपींची विकृती समोर आणल्याने संताप व्यक्त होत आहे.
परळी (जि.बीड) येथील महादेव मुंडे याच्या हत्तेचा आठपानी शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. वाल्मीक कराडचा एकेकाळचा सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात थेट आरोपींची नावे सांगत हत्तेचे फोटो पत्रकार परिषदेत समोर आणले. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल समोर येताच बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद आयोजित करत महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येचे धक्कादायक खुलासे केले आहेत.
शवविच्छेदन अहवालात गळ्यावर, मानेवर, चेहर्यावर खोलवर एकून 18 वार झाल्याने अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू असे नमुद आहे. त्यानुसार महादेव मुंडे यांच्यावर एकून 21 वार झाल्याचा दावा करत बाळा बांगर यांनी हत्येचे फोटो जाहिर केले आहेत. महादेव मुंडे याच्या पायावर वार करण्यात आले त्यावर महादेव मुंडे रेंगाळत पळत सुटले व म्हणाले मला लेकरं बाळ आहेत मला सोडा जावूद्या अशी अर्त विनवन्या करत होते. मात्र, गोट्या गित्ते, श्री कराड व भावड्या कराड (वाल्मीक कराड याची मुलं) यांनी त्याच्यावर सपासप वार केले.
घटनास्थळावर एक व्यक्ती साक्षिदार होता त्यासही वाल्मीक कराडच्या गँगनेच संपवले त्यास परळी पोलिसांनी आरोपीची पद्धतशीर पाठराखन केल्याचा दावा बाळा बांगर यांनी दोन दिवसापूर्वी केला होता. दरम्यान, दखादी कोंबडी कापावी तसा महादेव मुंडेंचा सर्व बाजून गळा चिरल्याचा दावाही त्यांनी फोटो दाखवत केला.
बाळा बांगर यांनी केलेल्या दाव्यानुसार शवविच्छेदन अहवालात गळा कापून हत्या, गळ्यावर तीन वार होते. गळ्यावर समोरून वार करण्यात आला. श्वासनलिका कापली गेली. रक्तवाहिन्याही फूटल्या. गळ्यावर 20 सेमि, 8 सेमि. आणि 3 सेमि. खोल अशा जखमा. वार चुकवताना चेहर्यावर 13 सेंटीमिटरचा खोलवर वार महादेव मुंडे यांनी हाताने वार चुकवण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या उजव्या हतावर तीन डाव्या हातावर असे वार आहेत.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी आज पुन्हा जरांगे पाटलांची आंतरवली सराटी येथे भेट घेवून त्यांना शवविच्छेदन अहवाल दिला.पोलिस यंत्रणेला अरोपी माहित आहेत वाल्मीक कराड, गोट्या गित्ते, श्री कराड, भावड्या कराड, राजा फड या आरोपींना पोलिस अधिक्षक साहेब अटक का करत नाहीत. कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडची कस्टडी घेवून त्याच्याकडून गुन्हा कबुल करून घ्यायला पाहिजे.
यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी तत्कालीन पोलिस अधिकारी श्री सानप, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचे सीडीआर तपासावेत आरोपी जवळपास निष्पन्न झाले आहेत त्यांना अटक करण्यात यावी. या प्रकरणात सरळ सरळ पोलिसांनी आरोपींची पाठराखन तर केलीच पण या कटात वाल्मीकचे हस्तक असलेल्या पोलिसांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोपही ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना केला.



Comments