top of page

महापालिका निवडणूकांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का..! माजी आमदार निर्मला गावित यांचा शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश



उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या निर्मला गावित यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे सदस्यत्व देण्यात आले. निर्मला गावित यांच्यसा शिवसेनेत प्रवेशानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मोठ्या संख्येने मलिा कार्यकर्त्या आधि शिवसैनिक उपस्थित होते. निर्मला गावित कोण आहेत आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश उद्धव ठाकरे गटसाठी मोठा धक्का का मनला जातो हे जाणून घेऊया


महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या वाईट निकालानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाईट दिवसांमधून जात आहे. आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक मोठे नेते एकनाथ शिंदे यांच्या शविसेनेत सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेत सामील करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेेने खुलासा केला की, नाशिक जिल्ह्यातीनल माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह, ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 1000 महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.


दरम्यान, निर्मला गावीत यांच्या शिवसेनेत प्रवेशानिमीत्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ शिवसेनेतील नवीन सदस्यांचे आगमन महायुती सरकारच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिबिंब आहे. लोकांना असे वाटत आहे की, आमचे सरकार काम करत आहे आणि लोकांची सेवा करत आहे.


महाराष्ट्र निवडणूकीपूर्वी महायुतीची ताकद वाढली :

महाराष्ट्रातील मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये होणार्‍या नगरपालिका निवडणूका जवळ येत आहेत. ज्यामुळे सर्व राजकीय पक्षांमध्ये तयारी तीव्र झाली आहे. विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा विजय मिळविल्यानंतर, भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका निवडणूका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्रातील नागरी निवडणूकीपूर्वी माजी आमदार निर्मला गावित आणि त्यांचे समर्थक शिवसेनेत सामील होणे हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


Comments


bottom of page