top of page

उमरखाडीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण

उमरखाडीत समूह पुनर्विकास योजना राबवणार - खासदार देवरा



मुंबई : नळबाजार येथील एसबीयुटी प्रकल्प आणि कामाठीपुराच्या समूह पुनर्विकास धर्तीवर डोंगरी उमरखाडी येथील म्हाडाचा ११ इमारतींचा समूह पुनर्विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बोलणी करून लवकरात लवकर राबवणार असल्याची घोषणा शनिवारी माजी केंद्रीय मंत्री व खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. देवरा उमरखाडी येथे शिवछत्रपती पुतळ्याच्या लोकरपणासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली.



माझ्या प्रयत्नांमुळे आज दक्षिण मुंबईतील उमरखाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला आहे. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो, असे बोलून देवरा यांनी भाषणाला सुरवात केली. मला पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे की, या शिव पुतळ्याच्या माध्यमातून महाराजांचे शौर्य आणि सुशासन भावी पिढीला नक्कीच प्रेरणा देत राहील. मला ही संधी दिल्या बदल मी सर्वांच्या वतीने शिवसेना मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील यांना धन्यवाद देतो.


उमरखाडीतल्या पीएमजीपी इमारतीत राहणारे लोकांसोबत माझे आणि माझ्या वडिल मुरली देवरा यांचे खूप चांगले संबंध आहेत. मुरलीभाई या विभागाचे खासदार होते मी पण अनेकवेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. मुरलीभाई नेहमीच मालकांच्या विरोधात सामान्यांना न्याय देण्यासाठी झटत होते. मी सुद्धा गेल्या वीस वर्षापासून या विषयासाठी झटत आहे. एसबीयुटी कामठीपुराच्या धर्तीवर उमरखाडीचा ११ इमारतींचा समूह पुनर्विकासासा मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मार्गी लावणार असल्याचे त्यांनी रहिवाशांना सांगितले आहे.


आज खूप अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. उमरखाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते दूरदृष्टी असलेल एक नेतृत्व आणि सदैव जनतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वाहून नेणारे ते महान योद्धा होते. त्यांनी आपल्याला स्वराज्य स्थापन करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार, कार्यशैली आणि संघर्ष हा नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.


-प्रिया पाटील

शिवसेना महिला उपविभागप्रमुख

मुंबादेवी

Comments


bottom of page