top of page

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दिव्यांगाचा मोर्चा नांदेडमध्ये हजारो दिव्यांगांचे भिक मांगो


केंद्र आणि राज्य शासनाकडून दिव्यांगाच्या कल्याणासाठी राखीव निधी आमदार, खासदार खर्च करत नसल्याचा अरोप दिव्यांग संघटनांकडून करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या हक्काचा अखर्चित निधी खर्च करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांच्या वतिने लोकप्रतिनिधींच्या दरासमोर भिक मांगो आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या दारासमोर दिव्यांगांनी भिक मागत खासदार चव्हाण यांनामागण्यांचे निवदेन दिले.


जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त निधी खर्च केला नाही. त्यामुळे दिव्यांगांची उन्नती होत नाही, परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींकडून निधी खर्चाची आंमलबजावणी झाल्यास दिव्यांगांना सक्षमतेनुसार छोटे व्यवसाय थाटता येतील यातून दिव्यांग स्वावलंबी होईल.


मात्र, लोकप्रतिनिधींच्या उदाशिनतेमुळे गेल्या कित्तेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याकडून दिव्यांगाच्या हक्काचा निधी खर्च केला जात नाही, वारंवार मोर्चे आंदोलनं, निवेदने देवूनही मागणीची दखल घेतली जात नसल्याचाा आरोप दिव्यांग संघटनेचे राहूल साळवे यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींकडून दिव्यांगांच्या हक्काचा अखर्चित निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी आज शहरातील ओम हॉटेल शिवाजीनगर येथून हजारो दिव्यांगाच्या सहभागाने भिक मांगो आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात सहभागी दिव्यांग बांधवांनी शहरवासीयांकडे भिक मागत मागण्यांकडे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष राहूल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोर्चातील दिव्यांग बांधव भिक मागत- मागत माजीमुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर धडकले. यावेळी खासदार चव्हाण यांनी दिव्यांगांच्या मागण्या जाणून घेत प्रशासनाचे तसे पत्र प्राप्त झाल्यास निधी खर्च करण्यात येईल असे अश्वासन देत मोर्चेकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले.

आमदारांच्या घरावर डकवले निवेदन:

दिव्यांग मोर्चेकरी आमदार राजेश पवार यांच्या घरी गेले असता आमदार राजेश पवार हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने मोर्चेकर्‍यांनी मागण्यांचे निवेदन त्यांच्या घरावर डकवले.

Comments


bottom of page