top of page

मुंबईत गावाकडच्या रसदीचा ओघ !

मुंबईकरांच्या साथीला एकवटली गांव; भाकरी, ठेचा, पिठलं, लोंच गावचामेवा घेवून शेकवडो वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना



मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान, मुंबईतील खासकरून आझाद मैदान परिसरातील अन्न-पाणी पुरवठा करणारे हॉटेल्स बंद केल्याची वार्ता कळताच गावखेड्यातून भाकरी, चटणी, ठेचा, पिठलं, लोंच, पुरी, भाजी, फरसाण, पाणी बॉटल यासह आदी खाद्य पदार्थांची रसद मुंबईकडे रवाना करण्यात येत आहेत. मुंबईकरांनी सुरू केलेल्या सेवेला साथ म्हणून आंदोलकांसाठी गावकडच्या मेव्याची शेकडो वाहनं मुंबईच्या दिशेने रवान झाली आहेत.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवार (29) ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांच्या समवेत लाखो मराठा बांधव सहभागी आहेत. सरकारकडून जरांगे पाटील यांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम एक दिवसाची व त्यानंतर एक दिवसाची अशी दोन दिवसाची परवानगी देण्यात आली. दरम्यान, आंदोलकांची गैरसोय होवून ते हतबल होवून परले पाहिजेत ज्यामुळे

आंदोलनाची तीव्रता कमी होईल या उद्देशाने सरकारने आझाद मैदान परिसरातील हॉटेल बंद केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनकांना परसिरात फिरुनही तहान भागवण्यासाठी घोटभर पाणी मिळत नसल्याचे सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाले. पैसे मोजूनही भुक भागणार नाही.


आंदोलकांच्या अशा कोंडीचे सोशल मिडियावर मॅसेज फिरताच मुंबईकरांच्या सेवेला हातभार म्हणून ग्रामीण भागातील गावखेडे एकवटले आहेत. मुंबईत आंदोलनासाठी गेलेल्या आंदोलकांची तहान-भुक भागवण्यासाठी आता गावा गावातून भारी, चटणी, लोंच, पिठलं, पुरी-भाजी, यासह खाद्य पदार्थ पाठवण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलकांसाठी गावाखेड्यातून हजारो भाकरींसह पाणी बॉटलचे बॉक्स पाठवण्यात येत आहेत. पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, लातूर आदी जिल्ह्यांतून ही रसद घेवून शेकडो वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत.

Comments


bottom of page