मुंबईत बिल्डिंगच्या 16 मजल्यावरून क्रेन कोसळली,24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

मुंबई: मुंबईतील मीरा रोड परिसरात गुरुवारी (दि.16) धक्कादायक घटना घडली आहे. मिरारोडच्या जेपी नौर्थ कॉम्प्लेक्समध्ये एका बांधकाम साईच्या 11 व्या मजल्यारील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या वाहनांवर पडली. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. क्रेनच्या ढिगार्याखाली एक जण आडकून गंभीर जखमी झाला. तर एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मीरारोडच्या विनय नगर येथील जेके आयरीस बिल्डिंगच्या बाजूला नव्या बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते. या बिल्डिंगच्या 16 व्या मजल्यावरून बांधकाम साहित्य वर नेण्यासाठी वापरण्यात येणारी टॉवर क्रेन अचानक कोसळली. क्रेनचा मोठा भाग थेट बाजूच्या जेके आयरीस सोसायटीच्या पार्किंगमध्ये पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. क्रेन कोसळल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत सुरुवातील अनेक नागरिक क्रेनखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र क्रेनच्या खाली दोन जण अडकल्याचे आढळून आले. त्यातील एक गंभीर जखमी झाला असून 24 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांनी भेट दिली असून गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांची खासगी रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असून ही घटना का घडली याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आम्ही केली आहे असं आमदार नरेंद्र मेहता म्हणाले.



Comments