top of page

मुंबादेवीमध्ये शिवसेनेकडून छत्री वाटप

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; नागरिकांनी घेतला लाभ


मुंबई : मुंबादेवीत शिवसेनेकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात हातभार लावला.

 

 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, शिवसेनेचा अभिमान! या ब्रिद वाक्याखाली मुंबादेवी विधानसभा वॉर्ड क्र. २२३ मध्ये विधानसभा संघटक रूपेश पाटील व महिला उपविभाग प्रमुख सौ. प्रिया रूपेश पाटील यांच्या माध्यमातून १५०० ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान आणि मोफत छत्री वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमास शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना प्रवक्त्या शायना एन. सी., विभागप्रमुख दिलीप नाईक, विधानसभा प्रमुख रेखा सुरणकर, शाखाप्रमुख उमेश माने, संतोष यादव, दत्ता मोहिते, मुंबादेवी विधानसभा युवासेना विभाग प्रमुख अभय म्हात्रे, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच आपला रुपेश फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Comments


bottom of page