top of page

मोदी सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 74 वर्षानंतर भारतात पुन्हा होणार जातीय जनगणना!


ree

1947 पासून आजपर्यंत भारतात जातीय जनगणना झालेली नाही? आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक आणि मोठे पाऊल उचलेले आहे. येत्या जनगणनेत जातीचा डेटा समाविष्ठ केला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, ‘ अनेक राज्यांनी त्यांच्या पातळीवर जात सर्वेक्षण केले. परंतू ते वैज्ञानिक आणि पारदर्शक नव्हते. यामुळे समाजात संशय निर्माण झाला. म्हणूनच आता जात गणना, जनगणनेचा भाग बनवली जात आहे. जेणेकरून हे काम पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होईल.


राज्यांचा अनुभव आणि राजकारणाचा रंग

2022 मध्ये सर्व जातींची गणना पूर्ण करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशनेही आलीकडेच जात सर्वेक्षण केले. काही पक्षांनी राजकीय फायद्यासाठी जातीय जनगणनेचा वापर केल्याचा सरकारचा आरोप आहे.

Comments


bottom of page