top of page

राजकिय पक्ष युतीच्या आखाड्यात !, ठाकरे, पवार नंतर आता हे दोन पक्षांची चर्चा


ree



महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर ‘साद-प्रतिसाद’ सुरू असताना नुकत्याच पुण्यात एका बैठकीमध्ये पवार काका पुतण्यांचेही मनोमिलन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना टाळी दिल्याने आंबेडकरी चळवळीतील विविध गटांमध्ये विभागलेले कार्यकर्ते यानिमित्तान एकत्र येणार का? असा अशावादी प्रश्न उपस्थित होत आहे.


अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऑफिसला जाऊन आलो. न्यूयॉर्कला बाबासाहेबांचे स्मारक होण्याची मागणी आहे. तिथे बाबासाहेबांच्या वस्तुंचे म्युझियम असावे, अशी अमेरिकेतील लोकांची मागणी आहे. महाबोधी महाविहारचा विषय राज्यभरात गाजतोय. 100 भिक्षु बोधगया येथे बसले आहेत. महाबोधी महाविहार देण्याची मागणी केली जात असल्याचे आठवले म्हणाले. बौद्ध समाजाच्या ट्रस्टमध्ये हिंदू लोक असावेत. यात 8 सदस्य हे बैद्ध समाजाचे असावे अशी मागणी असल्याचेही आठवले म्हणाले.


प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो पाहिजे. आरपीआयच्या लोकांनी एकत्र आल पाहिजे असे आमचे प्रयत्न असतील मराठीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. हिंदी आल्यानंतर काहीच विरोध नाही. राष्ट्रभाषेला विरोध होऊ नये असे आठवले म्हणाले. मुंबईत मराठीत बोलल पाहिजे असे विषय घेणे चुकीचे आहे. यात बँका मराठीत चालवणे अशक्य आहे. बोर्ड मराठीत ठीक आहे. मराठी राज्यभाषा म्हणून मान्यता दिली आहे. पण हिंदीला विरोध करणे योग्य नाही.


यावेळी रामदास आठवले यांनी केंद्रीय योजनेतील लाभार्थ्यांची अकाडेवारी दिली. 14 लाख जनधन अकाऊंट उघडले गेले आहे. यात 20 लाख रुपयांच कर्ज मिळणार असल्याचे ते म्हणाले. राहूल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन वाईट बोलू नये. लोकसभेत जेव्हा जास्त जागा मिळाल्या तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला नाही. कर्नाटक काँग्रेसवर आम्ही प्रश्न उठवले नाही. काश्मीरमध्ये ट्रेन गेली. राहूल गांधी यांनी एकवेळ मोदींचे कौतुक करू नये पण बदनामीही करू नये. अमेरिकेपक्षा चांगले रस्ते भारतात आहेत. देश पुढे जातोय यावर आम्ही बोलतोय. राहूल गांधी यांना देशाबाहेर जाऊन बोलण्याची सवय असल्याचेही आठवले म्हणाले.

Comments


bottom of page