महाराष्ट्राचा 7 लाख 69 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला अर्थसंकल्प; दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मृतींना अर्थसंकल्प समर्पीत, शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 4 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची देण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवणार, लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष करमुक्त आल्या आहेत.
हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष आठवण काढली. आजचा हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे , असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्वाच्या घोषणाही केल्या.
विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे भाषण करताना मोझे मन जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त मंत्रालयाची धुरा सांभाळलेले अजितदादा पवारयांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडला होता. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली होती. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला दिशा देत आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांना साजेशे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो, तसचे अजित पवार यांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प समर्पित करतो, असे दवेेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार्या अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बाराजमी विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. राज्याच्या वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते, अखेरीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प विधानसभेत मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकर्यांना कर्ज माफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर , 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीकर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच, नियमित कर्ज परतफेड करणार्या पात्र शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले.
युवा-शिक्षण- क्रिडा तसेच कृषी क्षेत्राकउे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबईत 6 देशांचे विद्यापीठ सुरू केले जाणार असून याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी देखील सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना इस्त्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी या योजनेतून मिळू शकणार आहे.
त्याचबरोबर, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट (महिमा) या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. ज्यामुळे परदेशी नोकर्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शनास मदत मिळणार आहे. तसेच समुपदेशन सेवा विस्तार आणि आधिक संघटित व्यवस्थेसाठी 36 नवदिशा केंद्र स्थापन करणार आहे.
स्टार्टअपला बळ देणार : स्टार्टअपला बळ देण्यासाठी महाराष्ट्र अर्थसंकल्पात स्टार्टअप, युनिकौर्नमध्ये महाराष्ट्र नंबर 1, पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक घडवणार आहे. यामुळे 50 हजार स्टार्टअपला बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडमधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये सर्वोत्तम 50 स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण प्रकल्प शासनात राबविण्यासाठी 25 लाखांपर्यंतच्या शासकीय कामाचे थेट वर्कऑर्डर्स दिले जातील.
मिशन लक्ष्यवेध : अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटिंग, रोईंग, सेलिंग, लॉनटेनिस, टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्य स्तरावर 8 हायपरफॉर्मन्स सेंटर्स सुरू, आता आणखी 4 केंद्र सुरू करणार आहे. विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता केंद्र सुरू करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प : राज्याची आर्थिक परिस्थिती सर्वांना माहिती असताना कर्ज काढून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. का कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात वारंवार 2047 चा उल्लेख करण्यात आला असला तरी जाहीर केलेली कर्जमाफी 2047 पर्यंत पूर्ण होणार का, याचे उत्तर सरकारने द्यावे, राज्यातील महामार्ग प्रकल्पासांसाठी माठ्या निधीची तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, कंत्राटदारांसाठी ठेास योजना दिसत आहेत. मात्र शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी ठोस उपाय योजना दिसत नाहीत. हा विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे. पाच वर्षापूर्वी आमच्या सरकारने कालबद्ध पद्धतीने शेतकर्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्या वेळी कोणत्याही अटी किंवा निमय लावले नव्हत. तसेच कोरोना काळात नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सध्याच्या सरकारने कर्जमाफी करताना अनेक अटी लावल्या आहेत. बुलेट ट्रेन बाबत बोलतान उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईचा सामान्य नागरिक अहमदाबादला जाऊन नेमके काय करणार याचे उत्तर सरकारने द्यावे. जाहीर करण्यात आलेल्या योजनांसाठी निधी कुठून आणणार याबाबतही सरकारने स्पष्टता दिलेली नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

सरसकट कर्जमाफीची आवश्यकता: दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीने शेतकर्यांना फार काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यासाठी सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, किमान चार लाख रुपयांपर्यंत कर्ज कर्ज माफीची अपेक्षा होती. आम्ही पाच वर्षापूर्वी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी केली होती त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे.
बाळासाहेब थोरात ( माजीमंत्री,ज्येष्ठ नेते काँग्रेस)

केंद्राप्रमाणेच राज्यसरकारनेही गाजर दिलं: आजचा अर्थसंकल्प केवळ आकड्यांची फेकाफेकी होती. सरसकट कर्जमाफीचे अश्वासन दिले होते, आता म्हणतायत दोन लाख रुपयांची कर्ज माफी. शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केलेली आहे. विकास शेतकर्यांचा विकास दर, तुम्ही म्हणतायत नऊ टक्यांनी शेतकर्यांचं उत्पन्न दर वाढणार. मग विकासदर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 3.5 पाच टक्यांनी कमी कसा काय झाला, लाडकी बहीणीबाबत ही तेच. या अर्थसंकल्पामध्ये घोषणाबजी आधिक आहेत पण तरतुदी त्या ठीकाणी दिसत नाहीत.
यशोमती ठाकूर (माजीमंत्री राष्ट्रवादी)

तकलादू कर्जमाफी : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकर्यांचा सातबारा कोरा, कोरा म्हणून टाहो फोडून प्रचार केला आणि शेतकर्यांची मते घेतली. मात्र याच फडणवीस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 2 लाखांपर्यंतची कर्ज माफी जाहीर करून शेतकर्यांचा विश्वासघात केला. अटी, शर्थीमुळे लाखो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत.
राजू शेट्टी (माजी खासदार, शेतकरी नेते)



Comments