top of page

रायगडमध्ये मुसळधार, रोहा तालुक्यात ‘ढगफुटी’ नदी-नाल्यांना पुर; शेतशिवारांना तळ्यांचे स्वरुप अनेक गावांचा संपर्क तुटला.

ree

रायगड जिल्ह्यात सोमवार पासून दमदार हाजेरी लावली आहे. सततच्या दमदार पावसामुळे महाडमधील सावित्री, रोह्यातील कुंडलिका, सुधागड तालुक्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांउली आहे. महाड, पोलापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याने सखल भागात पाणी साचले आहे. रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून शेतशिवारांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलाड परिसरातील मुंबई - गोवा महामार्गावर पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.



रोहा तालुक्यात मंगळवारी सकाळापासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाल्यान जनजिवन विस्कळीत झाले. शहरातील बाजापेठेसह रस्त्यांंना नदीस्वरूप आले. त्याचबरोबर तळाघर, निवी, भुवनेश्वर, चणेरा, खुटला, उडदवणे, मालसई, कोलाड, सुकेळी आदी गावांना अक्षरशा पावसान झोडपून काढले. नदी, नाल्यांच्या पुराचे पाणी लोकवस्तीत शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महादेवखार येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली तर नागोठणे भिसे खिंडीतही चार पाच ठिकाणी दरड आणि रस्त्यालगत झाडे कोसळल्याने या मार्गांवरील वाहतूक थांबली होती. पीडब्लूचीच्या अधिकार्‍यांनी तत्परतेन अथकपरिश्रमाने मलबा, दगड, झाडे हटवून वाहतूक पुर्ववत केली.

ree

कुंडलिका नदीने धोक्याने पातळी ओलंडल्याने जुना पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे या पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली. रोहा शहरातील अष्टमी, कोळीवाडा आणि नाका भागात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. सततच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांच्या पुराने शेतशिवारांना वेढा घातल्याने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली. हजारो हेक्टर शेतातील पिक पाण्याखाली गेल्याने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यां शेतीच्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मुसळधार, ढगफुटी सद़ृश्य पावसामुळे रोहा तालुक्यातील नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Comments


bottom of page