राज्यातील 2997 धरणात 72.38 टक्के पाणीसाठा
- Navnath Yewale
- Aug 9, 2025
- 1 min read
सर्वाधिक कोकण विभागातील 173 धरणांत 84.83 टक्के पाणी साठा; मराठवाडा विभागातील 920 धरणात 58.97 टक्के पाणीसाठा

राज्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पावसाने हाजेरी लावल्याने धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नदी नाल्यांना पुरस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील 2997 धरणात 72.38 टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. ज्यामध्ये मराठवाडा विभागातील 920 धरणात 58.97 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्यातील उजनी, कोयना, आणि जायकवाडी ही तीन मोठी धरणेही ओव्हाफ्लो झाली आहेत.
यंदा मे, जून, जूलै महिन्यात राज्यात दमदार पावसाने हाजेरी लावल्याने नदी नाले ओसांडून वाहिल्याने मे महिन्यातच काही धरणांच्या पाणीपातळीत वाढ होवून ते निम्यावर आले होते. तर काही जूल- जूलैच्या दरम्यान संततधार पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले.
राज्यात लहान-मध्यम व मोठे असे एकून 2997 धरणं आहेत, या धरणांत आजस्थितीत 72.38 टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. कोकण विभागामध्ये 173 धरणांत 84.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पुणे विभागातील 720 धरणात 82 टक्के पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागातील 920 धरणात 58.97 टक्के, अमरावती विभागातील 264 धरणात 62.42 तर नागपूर विभागातील 383 धरणात 64.13 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ज्यामध्ये राज्यातील तीन मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत.
उजनी धरण 98.88 टक्के
कोयना 82 टक्के
जायकवाडी धरणं 93.64 टक्के



Comments