top of page

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

विधानपरिषद निवडणधुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी जागेवरुन नाराजी व्यक्त केली असून मविआ तसेच महायुती दोघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आहे. आता आणखी एक महत्वाची अपडेट सोलापूरातून आली आहे.


सोलापूरातील जागेवरून मविआमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा होत्या. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते उत्तम जानकर हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. आधी त्यांची विश्वासू नेता असूनही जागा न मिळाल्याने खटपट सुरूच होती. आता ते थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन अमादार या भेटीसाठी गेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. उत्तम जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात.

Comments


bottom of page