रुपाली चाकणकर यांचे रायगड कनेक्शन उघड, एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशो खरात प्रकणामुळे अडचणीत आलेल्या रुपातील चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत. तर दुसरीकडे शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारप्रकरणी एसआयटी कडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांना पुष्टी मिळताना दिसत आहे. सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायत भागीदार असल्याची महिती समोर आली आहे.
कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी च्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा करत भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला होता. याप्रकरणी बबलू सय्यद यांनी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे चाकणकर आणि चौधरी यांच्या व्यावसायिक युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यासोबत तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक मोठ्या कंपन्यांची नोंदणी आहे. यात प्रामुख्याने ओशन पर्ल मेेरियटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत रिव्हर राप्टिंग, गीता अॅग्रो अॅन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, एफएल3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल अॅडव्हेंचर रिसॉर्ट यांसारख्या व्यवसायाचा समावेश आहे.
तर दुसरीकडे अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचाव आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणार्या विशेष पथकाने आता आपला मोर्चा खरातशी संबंधित शिवनिका या संस्थेकडे वळवला आहे. या संस्थेच्या सर्व व्यवहरांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेच्या आजी- माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आले आहेत. तसेच खरातशी असलेल्या ओळखीमुळे रुपाली चाकणकर आता पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात सापडल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. यावेळी गुलाबो गँग चाकणकरांविरोधात तीव्र निदर्शने करणार आहे.



Comments