top of page

वकिल गुणरत्न सदावर्तेची जालन्यातील धनगर आरक्षण आंदोलनास भेट

ree

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज जालना येथे धनगर आरक्षण आंदेालनास भेट दिली. आंदोलनकर्ते दीपक बोर्‍हाडे यांची सदावर्ते पती-पत्नीसह त्यांच्या मातोश्रींनी भेट घेवून चर्चा केली. आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजेश टोपे यांच्या निशाना साधला.


सदावर्ते म्हणाले की, राजेश टोपेंनी सांगून टाकावं की त्यांनी मनोज जरांगेंना काय काय मदत केली आहे. छगन भुजबळ यांचं वाक्य ना वाक्य सत्य आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. राजेश टोपे यांनी उदार अंतकरणाने सांगावं की किती बैठका झाल्या? काय बोलणे झाले? हिंसक गोष्टी त्यांना माहित होत्या का नव्हत्या? असंही सदावर्ते म्हणाले. आम्ही हाके साहेबांसाठी गोपिचंद पडळकर, छगन भुजबळ साहेबांसाठी बोणारच जिथे आरे असेल तिथे कारे असेल.


अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावर देखील सदावर्ते यांनी टीका केली. तू कलाकार आहेस, गावकी काय आहे? गावठीमध्ये म्हटलं आहे की पाटलांनी सांगावं आणि बारा बलुतेदारांनी ऐकावं. गावकी नको, संविधान म्हण असंही सदावर्ते म्हणाले.

माझा धंदा रेतीचा नाही. मी टिप्परवाला नाही. मी चपटी पीत नाही, चपटी पाजत नाही, एसटी आरक्षणाची रस्त्यावर नाही तर न्यायालयात सुद्धा ही लढाई आपल्याला लढावी लागेल असे सदावर्ते म्हणाले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गासाठी मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही. यंत्रणा हलावा आणि बोर्‍हाडे यांच्याकडे या येतना नुसते येऊ नका कायदा घेऊन या. माझ्या धनगर, बंजारा, वंजारा बांधवांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढावं लागणार आहे.


जलन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला घटनेनंतर त्यांनी संताप व्यक्त केला. समाजकंटक आणि जरांगेचे दलाल असे नालायकच अशा भ्याड प्रकरांना जबाबदार असल्याची टीका सदावर्तेंनी केली. चांगलं काम करायला निघालं की असे अतिरेकी विचारांचे लोक अडथळे निर्माण करतात, हल्ला करणार्‍यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. जरांग्या आता तुझी माझी गाठ लवकरच आंतरवालीत उद्ग्नि होत सदावर्ते यांनी जरांग--े पाटील यांना इशारा दिला.


दरम्यान, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हैदराबाद गॅझेटला विरोध करत आज धनगर आरक्षण आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते. एकीकडे हैदराबाद गॅझेटला विरोध करत मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही, हैदराबाद गॅझेट गैरलागू आहे, सरकारचा निर्णय चुकीचा आहे. कायद्याच्या विरोधात आहे . म्हणायचं आणि दुसरीकडे हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा,वंजरी, धनगर समाजाला एसटी आरक्षणाची मागणी करायची असा दुटप्पीपणा केवळ महाराष्ट्रात जातियेतेच विष पेरण्यासाठीच का? अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत.


झेनच्या एका पत्रावर शाहिनबाग आंदोलनाचा गाशा गुंडाळला.


जरांगे पाटील यांच्या चलो दिल्लीच्या नार्‍यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. सदावर्ते यांनी आपल्या स्टाईलमध्ये माझी मुलगी जी काल परवा इंग्लडला गेली ती छोटी असताना शाहिन बागच्या आंदोलन सुरू होते. त्यावेळेस तिने एक पत्र तेथील प्रशासनाच्या वरिष्ठांना पाठवताच शाहिनबागचं आंदोलन गुंडाळावा लागलं. माझ्या मुलीच्या एका पत्राने शाहिनबागचं आंदोलन गुंडाळलं तर मी बाप आहे जरांग्या मी बाप आहे असंही सदावर्ते म्हणाले.

Comments


bottom of page