सचिन जाधवर आत्महत्या प्रकरण: बीड पोलिसांची वर्तणुकच संशयाच्या भोवर्यात; कुटुंबीयांचे गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Jan 25
- 3 min read

बीड: वस्तु व सेवा कर (जीएसटी) अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबीय नातेवाईकांना रस्त्यावर उतरावले लागले. त्यामुळे पोलिसांच्या संशयास्पद वर्तनामुळे कुटुंबीयांना न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड येथे जीएसटी कार्यालयात कार्यरत सचिन जाधवर 16 जानेवारी रोजी कार्यालयातून संध्याकाळी घरी न आल्यामुळे त्यांची पत्नी मयुरी यांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अवघ्या काळी तासांत 17 जानेवारी रोजी सोलापूर-धुळे मार्गावर कारमध्ये त्यांचा मृतदेह अढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयत सचिन जाधवर यांच्या खिशात सुसाईड नोट अढळून आली होती. दरम्यान, पोलिसांनी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांना सूसाईड नोट दाखवली नाही, असा अरोप मयुरी जाधवर यांनी केला आहे. त्याच बरोबर सचिन जाधवर हे गेल्या महिनाभरापासून माणसिक तणावामध्ये होते. त्यांनी खिशात सूसाईड नोट तर लिहून ठेवलीच पण आपल्या मोबाईमध्ये सुद्धा त्यांनी सूसाईड नोट लिहून ठेवल्याचे त्यांची पत्नी मुयरी जाधवर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
शुक्रवारी (दि. 23 जानेवारी) मयत सचिन जाधवर यांचे कुटुंबीय, नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांची भेट घेतली. पोलिस अधीक्षकांनी तपास सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मयुरी जाधवर यांनी पोलिस अधिक्षक कार्यालया समोर माध्यमांशी संवाद साधत पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप केले. सूसाईड नोट मध्ये स्पष्ट आरोपींची नावे असताना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास एवढा वेळ का लागतोय? आरोपींना अद्याप अटक का नाही? असे प्रश्न उपस्थित करत आम्ही न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला जीएसटी कार्यालयातील प्रदीप फाटे व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. कुटुंबीय नातेवाईकांच्या ठाम भूमिकेवर पोलिस ठाण्यातील अधिकार्याने वरिष्ठ अधिकार्यांना फोनवरून संवाद साधला, तेव्हा कुठे इच्छा नसताना गुन्हा दाखल करावा लागल्याचे चित्र दिूसन आले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशयास्पद ठरत आहे. आधी गुन्हा नोंद नसल्याचे सांगून आरोपीला सन्मानपूर्वक वागणूक, नंतर कुटुंबाच्या रेट्याने गुन्हा नोंद करणे . तसेच सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणूनही तत्काळ कारवाई न करता सोडणे, प्रकरणात गोंधळ निर्माण करणारे आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी दराडे यांनी म्हटले की, “ आम्ही मयत जाधवर यांचा मानसिक छळ झाला होता की नाही, याची चौकशी करत आहोत,” परंतु या विधानामुळे अनेकांना पोलिसांच्या तपासाची पारदर्शकता आणि तत्परतेवर शंका निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी न्याय मिळेल की नाही, याबाबत चिंता व्यक्त करत असून, प्रकरणाची योग्य चौकशी आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
सदर घटनेच्या सात दिवसानंतर शुक्रवारी दि.23 जानेवारी रोजी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नीसह त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक पोलिस अधीक्षक यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र पोलीस अधीक्षक यांनी तपास सुरू असल्याचे सांगत गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे जाधवर कुटुंबियांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर कुटुंबीयांकडून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर ठाणे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये फोन झाला. मात्र, कुटुंबीय नातेवाईक गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेण्यास तयार नसल्याने पोलिसांना इच्छा नसताना गुन्हा दाखल करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, कुठल्याही घटनेत पोलिसांना काही सुगावा लागल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखलन केला जातो. मात्र एका जीएसटी आधिकार्याच्या मृत्यू प्रकरणात सुसाईट नोट असतानाही गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल आठ दिवसाची दिरंगाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात आल्यानंतर उडवा-उडवीचे उत्तर देत अधिकार्यांसोबत फोन करत तपास सुरू असल्याचे सांगून कुटुंबियांना अंधारात ठेवण्याचे काम केले जात होते मात्र कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करून घेतला परंतु गुन्हा दाखल झाला मात्र तपास योग्य दिशेने अयोग्य मार्गाने होईल का, असा संशय व्यक्त केला जात असून पोलीस यंत्रणा नेमका कुणाच्या दबावाखाली असल्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा सचिन जाधवर हा श्री भगवान इंग्लिश स्कुल येथे असताना दोन अज्ञात व्यक्तीकडून शाळेत जात त्याला त्याच्या आईने बोलावले आहे असे सांगण्यात आले. मात्र शाळेतील व्यक्तीकडून आई किंवा वडील आल्याशिवाय मुलगा देता येत नसल्याचे सांगितल्याने यामुळे त्याचे अपहरण होण्यापासून वाचले मयत जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी सांगितले.



Comments