top of page

‘समृद्धी’ महामार्गावरील 18 लक्ष रुपये दरोडा प्रकरण: मास्टरमाईंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आरोपीचे बीड कनेक्शन; किरण गायवाड यास हिवसिंगा येथून अटक

बीड : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी एका कुटुबाला लुटण्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच भीती पसरली होती. या दरोडेखोरांना लवकरात लवकर अट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या मुख्य सूत्रधाराला बीडमधून जेरबंद करण्यात आले आहे.


सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक 538 ते 543 दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत तब्बल 18 लाखांचा दरोडा टाकला. तब्बल दीड तास हा थरार सुरू होता. याच दरोडेखोरांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बीडच्या शिरुर कासार तालुक्यातुन अटक केली आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाड असं त्याचे नाव आहे.


किरण गायकवाड हा हिवरसिंगा येथील राहणारा असून तांत्रिक आणि गुप्तहेरांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोडेखोरांच्या इतर साथीदारांचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरोडेखोरांनी खिळे आणि टोकदार लोखंडी पट्ट्यांचा वापर वाहनांचे टायर पंचर केले होते. त्यानंतर प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून बेदम मारहाण करत वाहनांचे टायर पंचर केले होते. त्यानंतर प्रवाशांना शस्तांचा धाक दाखवून बेदम मारहाण करत सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली होती.


दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वकिल असलेल्या मिश्रा कुटुंबीयांला मारहाण करत त्यांच्या जवळचे सोने- चांदीच्या दागिण्यांचा ऐवज लुटून नेला. या घटनेनंतर मिश्रा कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली खरी मात्र कुटुंब अजूनही दहशतीत आहे, तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार समृद्धीमहामार्गावर सुरू होता. मिश्रा कुटुंबीयांनी सांगितले की, दरोडेखोर 5 ते जण होते असे वाटले. सुरुवातील त्यांनी माझ्या बाळाला आढून घेतले आणि याला घेऊन जातो अशी धमकी दिली. त्यानंतर आमचे पैसे, मंगळसूत्र सोनं, सगळं ओढून घेतले, खाण्याचे सामान घेतले कपडे घेतले. आम्ही खूप धास्तावलो होतो. प्रत्येक सेकंदाला अनेक गाड्या जात होत्या. मात्र कोणीही थांबत नव्हतं.

Comments


bottom of page