स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पार्टन्सच्या वतिने वृक्षारोपन
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read

तलासरी: दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्पार्टन्स टीम च्या वतीने 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुलेट ट्रेन, सुपर हायवे या सारख्या प्रकल्पा साठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे .त्यासाठी निसर्गाचे सवर्धन करण्यासाठी एक प्रयत्न म्हणजे वृक्षारोपण करणे अती गरजेचे आहे.
स्वातंत्र्य दिना निमित्त वृक्षारोपण करत स्पार्टन्स टीम ने एक महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे की पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे खूप महत्त्वाचे आहे व सर्वांनी आपापल्या परीने पुढाकार घेऊन वृक्षारोपण करावे व पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान द्यावे.
गेली पाच वर्षे स्पार्टन्स टीम करजगवा मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहे. यावर्षी कराजगाव पाटीलपाडा येथे झाडे लावण्यात आली. हे वृक्षारोपण करण्यासाठी करजगाव पाटीलपाडा पेशा सदस्य मा. दिपक ठाकरे व स्पार्टन्स टीम चे सदस्य प्रशांत उराडे, विशाल ठाकरे, बालकृष्ण उराडे, नरेश घुटे, केशू शिंगडा, सुरेश बेंदर, गणपत मांगात, मनोज ठाकरे, किशोर ठाकरे, सूरज बेंदर, अविनाश बेंदर, हे उपस्थित होते.
Comments