top of page

हनी ट्रॅपप्रकरण वेगळ्या वळणावर, पिडितेच्या दाव्याने खळबळ !

करुणा मुंडेचा गौप्यस्फोट, पुराव्यासह खुलासा करण्याचा इशारा


ree

राज्याच्या राजकीय वर्तुळात हनी ट्रॅपचे वादंग उठले आहे. महायुती सरकारचा पायाच हनी ट्रॅपवर असल्याचा घणाघातील आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काही आमदार आणि अधिकार्‍यांच्या ‘रासलिा’ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. परमोच्च क्षण कैद झाल्यानेच अनेक जणांनी महायुतीला टेकू लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच करुणा मुंंडे यांनी या वादात उडी घेतली आहे. एका पीडितेसह त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अनेक गैप्यस्फोट केले.


एका एसीपी दर्जाच्या अधिकार्‍याचा फोटो दाखवत या पिडीत महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर कळवा पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यावर त्यांनी आरोप केले. मोबाईल नंबर घेत त्यांनी मॅसेज केले. पोलिस ठाण्यात चहा घ्यायला बोलावले. या अधकिर्‍याच्या बायकोने फोनवरून घरी चहा प्यायला बोलावले. तिथे त्यांची बायको नव्हती.तर अधिकार्‍याने पाण्यात गुंगीची गोळी टाकून मला बेशुद्ध केले. दोघांनी माझ्यावर लैगिंक अत्याचार केले. असा आरोप महिलेने केला आहे. मी दोघांविरुद्ध कळावा पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली. तिथे कोणीच तक्रार घेतली नही. पुढे वरिष्ठांकडे धाव घेतली पण कोणीच दखल घेतली नाही. पोलिस महासंचालक, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केल्यावर चौकशीला बोलावण्यात आले. पुरावे दिले. पण पोलिसांनी मलाच धमकावले असा आरोप पिडीतेने केला.


माझ्या पेनड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत. चांगला अधिकारी कोण नाही करणार. हवलदार च कोणी आहे का कोणी असं काही केलं असं. चांगला अधिकारी महिलांच्या विरोधात असं करणार नाही. उलट आपल्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचं पिडित महिलेने म्हटलं आहे.


अन्यथा पोलिस कार्यालयासमोर आंदोलन

करुणा मुंडे यांनी या पिडीतेवर अन्याय करणार्‍या पोलिसांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. हनी टॅ्रपमध्ये आमदार, खासदार, अधिकारी असणार, हनी ट्रॅप करताना मन भरलं की त्यांना हे ट्रॅप वाटत. महिलांवर हनी ट्रॅप चे नाव देऊ शकत नाही. 6 महिन्यापासून ही महिला फिरतेय. महिला कैद्यांवर तुरुंगात सुद्धा अत्याचार होत असल्याचे कोणीतरी मला पाठवलं आहे. अनेक महिलांवर असे अन्याय होत आहेत.


पण त्यांना कोणी न्याय देत नाही. प्रत्येकाचे हात दगडाखाली आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकउे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची वेळ मागितल्याचेही करुणा मुंडे म्हणाल्या. स्वराज्य पक्ष सेना माध्यमातून या प्रकरणी दाद मागत आहोत. येत्या आठ दिवसांत जर गुन्हा दाखल नाही झाला तर, डीसीपी ऑफिसला आंदोलनाचा इशाराही करुणा मुंडे यांनी यावेळी दिला.

Recent Posts

See All
बीड पुन्हा हादरलं; सरकारी वकिलाची न्यायालयात गळफास घेवून आत्महत्या

बीड, मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड कायम चर्चेत राहिलं आहे. आज बीड जिल्ह्यातील वडवणी येथी प्रथमसत्र न्यायालयात एका...

 
 
 

Comments


bottom of page