दादा गरड, अमोल खुने यांना पैसा, गाडी,पुण्यात प्लॅट करुणा मुंडेचे खळबजनक दावे
- Navnath Yewale
- 4 days ago
- 3 min read

बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंंडे यांच्यातील वैमानश्य उभ्या महाराष्ट्रा समोर आहे. एकेकाळचे जरांगे पाटील यांचे सहकारी आमोल खुने, दादा गरड यांच्यावर जरांगे पाटील यांच्या घातपाताचा आरोप करण्यात आला होता. आता या वादात करुणा मुंडे यांनी उडी घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीने जातीवादाचा वणवा पेटला!. मधल्या काळात जरांगे पाटलांचे एकेकाळचे सहकारी दादा गरड, अमोल खुने यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून सुपारी घेवून जरांगे पाटीलांच्या घातपाताचा कट रचल्याचा अरापे करण्यात आला होता. जालना पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटकही केली होती. यापैकी अमोल खुने हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. कारागृहातून बाहेर येताच अमोल खुने यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर अरोपांची सरबत्ती केली. नुकताच रायगडावरील टकमक टोकावर जाऊन आमोल खुने यांनी थेट कडेलोटाचे जरांगे पाटील यांना चॅलेंज देणारा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल केला. “ सरकारने या प्रकरणात वाट्टेल त्या यंत्रणेमार्फत कसून चौकशी करावी, यामध्ये मी दोषी अढळलो तर माझा याच टकमक टोकावरुन कडेलोट करावा अन्यथा जरांगे पाटील दोषी अढळले तर त्यांचाही कडेलोट करावा” असा खळबजनक इशाराच अमोल खुने यांनी दिला. आत यामध्ये करुणा मुंडे यांनी उडी घेत खळबजनक आणि तेवढेच धक्कादायक दावे केले आहेत.
करुना मुंडे यांनी सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओद्वारे दावे केले आहे की, दादा गरड, अमोल खुने यांच्या काही गोष्टी माझ्या सामेर झालेल्या आहेत. धनंजय मुंडेची आदत आहे ना, की पैेसे देवून कोणाचाही गैरवापर करणार, त्यांना असं वाटतयं की पैसे देवून आपण कोणत्याही व्यक्तीचे खच्चीकरण करु शकतो. हे मी होवू देणार नाही. दादा गरड आणि खुने हे म्हणतायत चेक करा, त्यांच्याकडे काय व्हिडिओ आहे हे मला माहित नाही. तरी पण धनंजय मुंडे कशासाठी त्यांना फ्लॅट देणार होता?, कशासाठी त्यांना पैसे देणार होता? कशासाठी त्यांना गाडी देणार होता? असे गंभीर आरोप करत त्यांनी या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी केली आहे.
पुढे बोलताना करुना मुंडे म्हणल्या की, पैसे देवून धनंजय मुंडे पंकजा मुंडे सोबत पण हेच केलं होतं, त्यांच्या घरातील सगळे नोकर, चाकर सगळे फोडले होते. आज माझ्यासोबत पण तीच स्टॅटेजी आणि जरांगे भाऊ सोबत पण ती स्टॅटेजी. पण आज ते भाऊ-बहीण एकत्र झाले त्यांना राजकारण करायचं आहे, पद, प्रतिष्ठा पाहिजे. पण आज एक मंत्री जर एका मंत्र्याची साथ देऊ शकतात. सत्ता, पद, प्रतिष्ठांसाठी तर आपण साधारण लोक साधारण माणसाला सपोर्ट करु शकत नाही का.? मी जरांगे भाऊंचे स्टेटमेंट बघीतलं की ‘ मी एक वर्ष काही बोलणार नाही’ अरे कशाला नाही बोलणार भाऊ तुमची गरज आहे लोकांना. धनंजय मुंडेंनी खुप लोक पैसे देवून बोलण्यासाठी ठेवले आहेत. कोणीपण उठसूट पत्रकार परिषद घेत आहे धनंजय मुंडे असे नाहीत पंकजा मुंडे अशा नाहीत. आरे आम्हाला सगळं माहिती आहे, 27 वर्षे मी घरामध्ये राहिलेली आहे. मी जरांगे भाऊंना का सपोर्ट करते, आज जे लोक ओबीसी म्हणून आवाज उठवतात आम्ही हे आहोत ते आहोत, समाजाची गोष्ट नाही इथे असं म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.
पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांच्यावर बोलणार्यांना सल्ला देत त्या म्हणाल्या तुम्ही जर खरंच ओबीसी समाजाचे आहेत, कोणत्या समाजाचे आहेत तुम्हाला जर समाजाच्या लोकांना न्याय द्यायचा आहे तर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे समाज नाहीच आहे. ते लोक फक्त राजकारणी आहेत. ते स्वत:च्या स्वार्थापोटी काम करत आहेत. समाजाचं नाव घेवून. जे लोक पत्रकार परिषद घेवून जरांगे भाऊंबद्दल बोलतायत त्यांना मी एक बोलते, खरच जर तुम्हाला ओबीसी समाजाच्या महिलांना, वंजारी समाजाच्या महिलांना खरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल आणि खरच समाजासाठी लढा द्यायचा असेल तर मी बोलते करुणा मुंडे साठी लढा, तीन-तीन वेळा मला जेलमध्ये टाकलं. आज माझ्या मुला बाळांची काय आवस्था आहे इथे येवून बघा. आणि पुजा चव्हाणसाठी लढा, ज्ञाणेश्वरी मुंडे ताई, काका गर्जे, संगिन डिघोळे, भगिरथ बियाणी, गौरी गर्जे पीए बाहेर आलेला आहे तीन महिने झाले नाही गौरी गर्जेंनी आत्महत्या नाही केली तीचा मर्डर करून काय पुरावे हात लागले होते मला सगळं माहित आहे. पण सगळे गप आहेत. कुठेतरी येवून सगळे मुद्दे थांबतात असं म्हणत करुणा मुंडे यांनी दादा गरड, अमोल खुने यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपक केले आहेत.



Comments