नाशिकच्या मोठ्या आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार जबरदस्ती मांस शेवन करण्यास लावले; धर्मांतराचाही प्रयत्न
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नामाकिंत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचार्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ छळच नाही तर पीडित महिलांना बळजबरीने मांस खाऊ घालून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आणि हिंदू देवदेवतांच अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले असून 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातून धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका प्रतिष्ठित मल्टिनॅशनल कंपनीत कामाला असलेल्या महिला कर्मचार्यांनी त्यांच्यासोबत घडलेला भयावह प्रकार पोलिसांसमोर मांडला आहे. कंपनीत काम करणार्या काही विशिष्ट धर्माच्या पुरुष कर्मचार्यांनी महिलांचे जगणे असह्य केले होते. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी केवळ विनयभंग केला नाही, तर महिलांना बळजबरीने मांसाहार करण्यास भाग पाडून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाही तर कार्यालयात काम करत असताना हिंदू धर्माबद्दल आणि देव- देवतांबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
आरोपींमध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांचा सामवेश आहे. कार्पोरेट अत्याचाराच्या प्रकरणात दोन पोलिस स्टेशन मध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विनयभंग, मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून एकूण 6 अरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक म्हणजेच स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गुुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जाणार आहे. कंपनीतील काही वरिष्ठ अधिकार्यांनीही या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांकडून सर्व खासगी आस्थापनांना इशारा देण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षेची जबाबदारी ही व्यवस्थापाची असेल. कोणत्याही महिलेला असा त्रास होत असल्यास त्यांना सीपी यांच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा किंवा 112 व संपर्क साधावा, असे अवाहन करण्यात आले आहे. तपासात अणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकउे आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो, तर दुसरीकउे नामांकित कंपन्यांमध्ये महिलांना अशा क्रूरतेला सामोरे जावे लागते, हे समाजासाठी लांच्छनास्पद आहे. आता एसआयटी च्या माध्यमातून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का आणि यातील मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments