top of page

बुलढाण्यात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा ! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थीनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तर चोपला

बुलढाणा: राज्यभरात महिलांवरील अत्याच्यारांच्या घटनांत संताप व्यक्त केला जात असताना, शाळेतील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही जोर धरु लागली. मात्र अद्याप शाळेत अशा घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर गावकर्‍यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.


जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणार्‍या एका नऊ वर्षीय विद्यार्थीणीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहित पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.


दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकर्‍यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदकरण्याची प्रक्रिया सुरू आहे . विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना आवधी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासण्याचं कृत्य केलं आहे. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments


bottom of page