मराठा आंदोलक आक्रमक धुळे- सोलापूर मार्ग रोखला पाडळशींगी टोलनाका चक्का जाम; महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या लांबच लांब रांगा

बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचे तिव्र पडसाद राज्यात उमटत आहे. आंतरवाली सराटीमध्ये अधिकार्यांशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी होत असतानाच बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. धुळे- सोलापूर मार्गावरील पाडळशींगी टोलनाक्यावर रात्री उशीरा चक्काजाम करण्यात आला.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने तात्काळ त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी(दि.1) सरकारचे शिष्ठमंडळ छत्रपती सभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा मसूदा जरांगे पाटील यांना दिला आहे, जरांगे पाटील यांच्याकडून त्यावर सकारात्मक भूमिकेची अपेक्षा व्यक्त करत मंत्री विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील अधिकार्यांशी बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले.
सरकारच्या शिष्ठमंडळाचा निरोप घेवून आलेल्या पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. धुळे- सोलापूर महामार्गावर बीडच्या पाडळशींगी टोलनाका रोखून धरत आंदोलकांनी महामार्गावर टायर जाळून प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या चक्का जाम मुळे धुळे- सोलापूर मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



Comments