नगरसेवकांचा विरोध टाळण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची नवी खेळी?

नाशिक: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने सुरू असलेल्या विविध कामांबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे. खरेतर मागच्याच महिन्यात त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी नगरसेवक येऊन बसले मात्र, अधिकार्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत बहुतांश नगरसेवक रागात निघून गेल्याने कामांचे सादरीकरण होऊ शकले नाही. नगसेवकांनी भाजप शहराध्याक्षांकडे याबाबत तक्रार केली होती.
या प्रकारानंतर कुंळमेहा प्राधिकरणावर नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. बैठक बोलावली जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता कुंभमेळा प्राधिकरणाने नगरसेवकांची पुन्हा बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आधीच्या बैठकीतील अनुभव लक्षात घेता बैठकीत वाद वाढू नये यासाठी कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कामांचे सादरीकरण करण्याची खेळी प्रशासनाकडून खेळण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून त्या निमित्ताने विविध विकास कामे सुरू आहेत. त्याबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना सविस्तरप माहिती दिली जाणार आहे. तसेच कुभ कामांबाबत नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्याची भूमिका प्राधिकरणाने घेतली आहे. महासभेत नगरसेवकांनी कुंभ कामकाजाबाबत अधिक माहिती देण्याची मागणी केली होती.त्यानुसार बैठक आयोजित देखील केली होती. परंतुू मागच्या बैठकीत झालेला गोंधळ व नाराजी पाहाता प्राधिकरण यावेळी वेगळी युक्ती वापरण्याच्या तयारीत आहे.
बैठकीत कुठलेही राजकारण होऊ नये, तसेच नगरसेवकांकडून होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी प्राधिकरणाने आता पालकमंत्री गिरिश महाजन यांच्यासह पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे नियोजन सुूरू केले आहे. जेणेकरून होणारा विरोध टाळता येईल तसेच कुठला वाद होणार नाही असे नियोजन केले जात असल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या बैठक नगरसेवकांकडून वेगवेगळे मुद्दे उपस्थितीत करून प्राधिकरणाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. जसे की, कुंभ विकास आराखड्यात महापालिकेने 61 रस्त्यांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी आत्तापर्यंत 28 रस्त्यांनाच मंजुरी मिळाल्याने उर्वरित रस्त्यांचे काय, असा सवाला नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पांबाबत प्राधिकरणाची भूमिका काय आहे, कोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, याचे स्पष्टीकरण नगरसेवकांकडून मागितले जाण्याची शक्यता आहे.



Comments