वकील असीम सरोदेचे मोठे गौप्यस्फोट; ... तर शिंदे सरकार टिकले नसते, दोन मोठ्या यंत्रणांचा उल्लेख
- Navnath Yewale
- Aug 6
- 1 min read

मुंबई: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत , न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी यावेळी ठाकरेंची बाजू कोर्टासमोर मांडली. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. असीम सरोदे देखील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टासमोर उपस्थित होते. सुनावणी पार पडल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदेचे सरकार टिकलं नसतं असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी 2 यंत्रणांचा उल्लेख करत महत्वाची माहिती मांडली.
विधानसभा अध्यक्ष, निवडणुक आयोग आणि न्यायालयाच्या भूमिकेबाबत असीम सरोदे यांनी शंका उपस्थित केली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत असीम सरोदे यांचा सर्वात खळबळजनक दावा केला.
सर्व याचिका प्रलंबित : निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या भूमिकेबाबत असीम सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने जर तेव्हाच निर्णय घेतला असता तर हे सरकार टिकलेच नसते. तसेच हे 40 आमदार आणि त्यानंतर आत्ता हे 6 खासदार फुटलेच नसते असा दावा असीम सरोदे यांनी केला. गुवाहाटीत असतानाच शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार पाडण्याची तयारी केली होती. आधी 16 आमदार होते. मग 40 आमदार झाले.
सरकारची स्थापना बेकादेशीर प्रक्रियेतून झाली, तरी सरकारने पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. निवडणूक अयोगाने शिंदेच्या बाजूने निर्णय दिला. तर, न्यायालयाने सुनावणी घेण्यास विलंब केला. वेळीच निर्णय दिला असता तर हे सरकार टिकलेच नसते असा मोठा गौप्यस्फोट करत निवडणूक अयोग आणि न्यायालय या दोन मोठ्या यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी देखील हाच लक्षवेधी मुद्दा उपस्थित करत कधीच शिंदेचे सरकार कधीच सत्तेत आले नसते असा दावा केला होता. शिवसेनेची याचिका 2021 पासून प्रलंबित आहे. जर यावर वेळेत सुनावणी होऊन निर्णय झाला असता, तर हे शिंदे सरकार स्थापन झाले नसते असा दावा कपिल सिब्बल यांनी केला होता.



Comments