top of page

विकृत अशोक खरातला 5दिवसाची पोलिस कोठडी शिर्डीतील कोट्यावधींचा व्यवहार ; प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होेते. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे खरातचा पोलिसांच्या तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिसर्‍या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे अमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एकीकडे खरातची कसून चौकशी सुरू असताना दुसरीकडे खरातशी संबंधितांनाही पोलिसांकडून नोटीस बजावली जात आहे.


अशोक खरातशी जवळीक असल्याच्या करणावरुन रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना एसआयटी पथकाने नोटीसही बाजवल्याची माहिती आहे. मात्र अद्याप त्यांची कुठलीही चौकशी झालेली नाही. आता, रुपाली चाकणरक यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस नोटीस बजावणार असल्याची महिती आहे. समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे दखील चार खाते आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्यानावे दोन तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खातील आहेत. विशेष म्हणजे, या चार खात्यांवर 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहाराची सखोल चौकशी होणार आहे.


समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेले 100 खाते तर सिन्नर येथील जगदंबा पतसंस्थेत खरात नॉमिपी अयलेले 22 खाते आहेत. सिन्नर येथील जगदंंब पतसंस्थेतील 32 खात्यांची चौकशी नाशिक ग्रामिण पोलिस करणार असून समता पतसंस्थेतील खात्यांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून केली जात आहे. तयच पार्श्वभूमिवर प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार असल्याची महिती आहे.


नकली वाघ, साप याचा तपास करायचाय? आज न्यायालयात तपास अधिकार्‍यांनी सांगितले की, आरोपी अशोक खरात लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवत असे. तसेच मंतरालेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करत होता. महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचा संशय असून,त्या पदार्थामध्ये काय मिसळले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच नकली साप, वाघ आणि इतर साहित्य तो कुठून आणत होता याचाही तपास बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments


bottom of page