top of page

संतोष देशमुख हत्या प्रकरण:धनंजय देशमुखांच खळबळजनक दावा!मस्साजोग गावातील चोरी प्रकरणी आमदार धस, धनंजय देशमुख, दादासाहेब खिंडकर यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट

बीड: केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास दिड वर्ष झाली आहेत. या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन सुनावणी देखील सूरू आहे. त्यातच आता भाप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख, आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांसोबत मस्साजोग गावात होणार्‍या चोर्‍या, घरफोडी आणि विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळत असून त्यांना केस मागे घेण्यासाठी एका ठिकाणी बोलावण्यात आल्याचा खळबळजनक दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.


धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुगांतून सुटल्यानंतर त्यासंबंधी एक दावा केला होता. त्या दाव्याला धनंजय देशमुखांनी बळकटी देणारे वक्तव्य केले आहे. संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आले होेते, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी त्यांच्यावरील असलेल्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्यासंदर्भात समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. त्याला आता धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला.


धनंजय देशमुख म्हणाले, संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलावून घेण्याचे षडयंत्र होते. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटले. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी बोलावले होते. त्याठिकाणी मी गेलो नाही. दादासाहेब खिंडकर प्रकरणाची तुलना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी करण्यात आली. मी 13 महिन्यानंतर यावर बोलत आहे. माझी बदनामी, खच्चीकरण कसे होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी न्यायासाठी लढत राहणार असल्याचे यावेळी धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.


धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यानंतर तुरुंगातून सुटून बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणी मोठा दावा केला. जुन्या व्हिडिओच्या आधारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि फसवण्यात आले. त्यानंतर आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख केस मागे घ्यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असा दावा खिंडकर यांनी केला आहे.


दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले, मस्साजोग गावात ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. परंतु लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments


bottom of page