ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलिन , शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले!
- Navnath Yewale
- 17 hours ago
- 2 min read

संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी अशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर आज (13 एप्रिल 2026) रोजी दुपारी 4:00 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल दहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरता बुडाला. आशा भोसले यांचं जाणं हा संपूर्ण देशासाठी धक्का आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 12 एप्रिलला वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज (दि.13 एप्रिल 2026) सकाळी अकरा वाजता अशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावली. सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री अशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा, भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच विश्वास नांगरे -पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4:00 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेतेही उपस्थित होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (दि.12 एप्रिल 2026) वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतरत्न आणि ‘ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीन असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखल जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.
आशाताईंची कारकीर्द : आशा भोसले यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि अथक परिश्रम घेतले. त्यांनी अगदी लहान वायातच गाणं शिकायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात, प्रस्थापित गायकांनी नाकरलेली गाणीच त्यांना गाण्यासाठी दिली जात असतं. मात्र, त्यांनी याच गाण्याचं रूपांतर आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यात केलं. हळूहळू, सिनेमांची गाणी, गझल, पॉप आणि शास्त्रीय संगीत अशा संगीताच्या प्रत्ये प्रकारात त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या परिस्थितीबद्दल कधीच तक्रार केली नाही. उलट, त्यांनी आपल्या कामालाच स्वत:बद्दल बोलू दिलं. त्यांच्या निधनानंतर, समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आणि त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
अशाताईंना गाण्यातून वाहिली श्रद्धांजली
पूर्ण देशाला आपल्या सुरांनी मोहिनी घालणार्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज साश्रू नयनांनी अखेरच निरोप देण्यात आला. संगीत चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित गायक कलाकारांनी आपल्या लाडक्या ‘ आशाताईं’ना त्यांच्याच गाण्यांच्या सुरांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. अशा वेळी शब्दांपेक्षा सुरांनीच भावनांना वाट करून दिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आशा ताईंसोबत अनेक दशके काम केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आशा ताईंच्या आठवणीत “ यह कल क्या हो किसने जाना ” हे अजरामर गाणे गायले. हे गाणे गाताना त्यांचा आवाजही गहिवरला होता, त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील आपल्या खास शैलीत गाणे साद करत आशा ताईंच्या सांगीतिक वारशाला वंदन केले. लोकप्रिय गायक शान यानेही आपल्या भावना सुरांच्या माध्यमातून मांडल्या.



Comments