top of page

मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस

15 hours ago
1 min read

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पाटोदा येथे उपोषण स्थगित केले. प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.पाटोदा येथे चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शनिवारी (दि.19) हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी मुंबईकडे कूच केली होती. आंतरवाली सराटी येथून मंगळवारी (दि.15) शहागड (ता. आंबड), गेवाराई (जि.बीड), बीड, मांजरसुंबा (जि. बीड) मार्गे पाटोदा येथे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी असताना मध्यराती त्यांची प्रकृती अचानक बिघडली. श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या आग्रहाने जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.16) उपचार घेतले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी (दि.17) दुपारनंतर मुंबईकडे कूच करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र, बुधवारी पहाटेच सरकारचे शिष्टमंडळ पाटोद्यात दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भूसे, आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईने जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.


उपोषण सोडल्यानंतर त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज शनिवारी (दि.19) मंत्री विखे पाटील यांनी हॉस्पीटमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेतली. विखे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता जरांगे पाटील यांनी वेदनांची आपबिती सांगितल. ‘ तुम्ही लवकर बरे व्हाल किमान पाच ते सहा दिवसात तुम्हाला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळेल. काळजी नसावी मागण्यांबाबत जे ठरलं आहे तेच होईल, तुम्ही नावे दिले की त्यानुसार त्यां व्यक्तींचा समितीमध्ये समावेश करुन कार्यवाही सुरू होईल असे अश्वासही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.

Comments


bottom of page