top of page

विलास घुले हत्या प्रकरणाचे सीआयडीकडून न्यायालयात दोषारोपत्र सादर खासदार पुत्राचा हत्याकांडात सहभाग नाही, न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात!

16 hours ago
1 min read

बीड: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यवसायिक विलास घुले याची हत्या करण्यात आली होती. भांडण मिटवण्यासाठी गेल्यानंतर विलास घुलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात सुरूवातीपासून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव फिर्यादीपक्षाकडून पुढं येत आहे.

अशातच आता या प्रकरणात सीआयडी तपासानंतर मोठी घडमोड समोर आली आहे.


विलास घुले हत्याप्रकरणात सीआयडीकडून मोठी अपडेट समोर आली आहे. यसा प्रकरणात दहा आरोपिविरोधात केज न्यायालयात 200 पनी दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती सीआयडीच्या तपासी अधिकार्‍यांनी दिली. दि.15 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दोषारोप पत्र दाखवले नाही असा आरोप रमेश घुले (मयत विलास घुले यांचे बंधू) यांनी केला आहे.

घुले कुटुंबियांकडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सौरव सोनवणे याचा या हत्याकांडात सहभाग असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता. मात्र सीसीटीव्ही आणि सीडीआर च्या तपासात त्यांचा सहभाग आढळून आला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बजरंग सोनवणे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असावा असे म्हणणे वावगे होणार नाही.


दरम्यान, या प्रकरणाचा सुरुवातील काही दिवस केज पोलिसांकडून तपास करण्यात आला. त्यानंतर आयपीएस अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी ने जवळपास दोन महिने तपास केला. पुढे तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आणि आता सीआयडी कडून न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रियेलाव सुरुवात झाली आहे.

Comments


bottom of page