Video/धुलिवंदनाची परंपराच लय भारी.., विडागावत जावयाची गर्दभ सवारी...! चप्पल-बुटांचा हार; पोषाखाचा आहेर अन् सोन्याची अंगठीही
- Navnath Yewale
- Mar 3
- 2 min read

बीड: होळी, धुलिवंदनाला जावायाचा अगळा वेगळा सन्मान करणार्या बीड जिल्ह्यातील विडा (ता.केज) गावच्या धुलिवंदनाची राज्याला उत्सुकता असते. जावयाला ‘नारायण’ मानून अधिक मासात (धोंडा मास) आवर्जुन बोलावून गोड पदार्थ, कपडे आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंचे वाण देवून त्याचा सन्मान केला जातो. तितकेच आदरतिथ्य आणि मान, सन्मानाने गेल्या 90 वर्षापासून विडा येथे चक्क जावायाची गर्दभ (गाढव) वरुन मिरवणूकीने धुलिवंदन साजरे करण्यात येते. यंदाच्या धुडळवडीचा मान गालफाडे यांना मिळाला आहे.
सारवाडीत जावयाचा ‘रुबाब’ हा एक खास कौटुंबीक विषय,सासु-सासर्यांकडून मिळणारा अतोनात मान, सन्मान, अपुलकी आणि पाहुनचार यामुळे जावई नेहमीच मध्यवर्ती आकर्षणाचे केंद्र असतो. सासुरवाडीत जावयाला ‘पाहुणा’म्हणून सर्वोच्च मान मिळतो. सासु -सार्याकडून ‘लाड’ करून घेणे आणि आपल्या मर्जीनुसार गोष्टी घडवून घेण्यात ‘जावाई’ शब्दातची जादू आहे.
बीड जिल्ह्यातील विडा (ता. केज) येथे अनोख्या धुलिवंदनाची 90 वर्षाची परंपरा कायम आहे . होळी आणि धुलीवंदनानिमित्त जावायाला मानपान देण्याची ही पद्धत सर्वत्र असली तरी ‘ जावायची गर्दभावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा विडा गाव गेल्या 90 वर्षापासून जोपासत आहे. गेल्या वर्षी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली हाती. मात्र एका वर्षाच्या खंडानंतर यंदा दि.3 मार्च रोजी पुन्हा ही ‘ गर्दभ सवारी’ ची मिरवणूक काढण्यात आली.
तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांनी ही परंपरा सुरू केली आहे. आतापर्यंत 90 हून अधिक जावयांची अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावातील सर्वात ‘हटके’ जावायाची निवड करण्यात येते. त्याला ‘चप्पल-बुटां’ हार घालून गर्दभावर (गाढवावर) बसवले जाते आणि ढोल -ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या शेवटी हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामपंचायतीकडून कपड्यांचा आहेर, तर सासरच्या मंडळीकडून 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन जावायाचा गौरव केला जातो. यंदाच्या धुलिवंदनाचा मान गालफाडे यांना मिळाला आहे. जावाई शोध मोहिमेत सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, राजकुमार पटाईत यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
जावाई शोध मोहिम, ग्रामस्थांची पथकं : धुलिवंदनासाठी जावाई शोध मोहिम राबविण्यात येते. बहुतांश जावई धुलिवंदनापूर्वीच ‘नॉट रिचेबल ’ असतात. दरम्यान अत्यंत गुप्तपणे तेवढीच वेगाने ही शोधमोहिम राबविण्यात येते. गाढव सवारीच्या भितीने अनेक जावाई आपल्या गावातून पसार होतात. पण ग्रामस्थ पथकं तयार करून मोठ्या शिताफीने जावायाला शोधून ग्रामपंचायत कार्यालयात ‘नजरकैदेत’ ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात.
सोन्याच्या दरवाढीचा फटका जावायालाही : धुलिवंदनाच्या परंपरेसाठी जावायला ग्रामपंचायतीकडून पोषाखाच आहेर तर सासुरवाडीकडील मंडळीकडून जावायला 5 ग्रॅमच्या आंगठीचा मान दिला जातो. सोन्याचे भाव गगणाला भिडल्याने यंदा विडा गावच्या जावायला अंगठीच्या मानापासून अलिप्त राहावे लागले.



Comments