top of page

अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचा दसवर्षपूर्ती सोहळा


डहाणू : कासा येथील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र याला आज दहा वर्षे पूर्ण झाली. गेल्या दशकभरात अनेक अडथळे पार करत हे केंद्र आजही खगोलशास्त्राची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. या प्रवासात दानशूर व्यक्ती, संस्था, मित्र आणि नातेवाईक यांचे सहकार्य केंद्राला लाभले असून संचालक चंद्रकांत घाटाळ यांनी त्यांचे आभार मानले.


या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा होता करोना काळ. त्या कठीण काळात युमेता या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिल्यामुळेच केंद्र आज उभे राहिले आहे, असे घाटाळ यांनी सांगितले. त्यानंतर जनजाती संस्था, अध्ययन संस्था आणि काही दानशूर व्यक्तींच्या आर्थिक व वस्तूरूप मदतीमुळे केंद्राला नवसंजीवनी मिळाली.सध्या केंद्राने शेकडो शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्राचे ज्ञान पोहोचवले असून दहा हजारांहून अधिक मुलांनी माहितीचा लाभ घेतला आहे. हा आकडा आता लाखाच्या घरात नेण्याचा मनोदय असून केंद्राला आणखी सुसज्ज करण्यासाठी आर्थिक व वस्तूरूप सहकार्याची गरज असल्याचे चंद्रकांत घाटाळ यांनी स्पष्ट केले.

Comments


bottom of page