top of page

आंतरवालीत मराठा- ओबीसींचं आंदोलन पर्व सुरू, पोलिसांची धावपळ मंगेश ससाणेंचे आंतरवालीत लाक्षणीक आंदोलन सुरू, मराठा आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्ग रोखला, जरांगेंची प्रकृती खालावली

आंतरवाली: मराठा आरक्षण मुद्यावरून जरांगे पाटील यांचे आंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू आहे, आंदोलनाचा आज रविवार (दि.6) नववा दिवस. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ झाल्याने जरांगे पाटील यांनी दि. 12 रोज चलो मुंबईचा इशारा दिला आहे. जरांगेंची प्रकृती खालवल्यामुळे रविवारी सकाळीच मराठा आंदोलकांनी वडीगोद्री येथे धुळे- सोलापूर महामार्ग रोखला, तर दुसरीकडे ओबीसी नेते तथा अ‍ॅड. मंगेश ससाणे यांनी सहकार्‍यांसमवेत आंतरवाली (सराटी) येथे लाक्षणीक सुरू केले आहे. त्यामुळे आंतरवालीत काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमध्ये दि.29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाच्या नवव्या दिवशी रविवार(दि.6) जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलकांनी वडीगोद्री येथे धुळे- सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी अचानक रास्तारोको सुरू केल्याने पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी ‘ एक मराठा, लाख मराठा’ जरांगे पाटील आगे बढो यासह सरकारविरोधात घोषणाबाजी करत लक्ष वेधले. आंदोलनामध्ये महिलांच्या सहभागामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अचानक रास्तारोकोमुळे धुळे- सोलापूर मार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


दिपक केदार यांनी घेतली जरांगेंची भेट: ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी रविवारी (दि.6) आंतरवालीत जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचापूरस करत सरकारला इशारा दिला. माध्यमांशी बोलताना दिपक केदार म्हणाले की, हैदराबाद येथे रोहित वेमुल्लाप्रमाणे सरकारला जरांगे पाटील यांचा तडफडून घात व्हावा हे सरकारचं षडयंत्र आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.


नऊ दिवस झालं तरी सरकार गांभीर्याने बघत नाही, निवडणुका नसल्यामुळं सरकार गांभीर्याने घेत नाही. येणार्‍या काळात मराठा, मुस्लीम आणि दलित सत्तेत बसणार मागणारे नाही तर देणारे होणार आहोत ही आमची भूमिका असणार आहे. राज्यात

हुकूमशाही अवस्था निर्माण झाली आहे, लढणारे जेलमध्ये, बापट यासाठी आनलाय की आंतरवालीत काय चाललंय हे दिसू नये, एक चापट मारली तर मुख्यमंत्री त्यावर प्रतिक्रिया देतात. मराठा समाजाने ठरवलं तर सत्तेत असणार्‍यांना खाली खेचू शकतात. वारंवार सरकार स्थापने पाठिमागे एव्हिएम कारणीभूत आहे, दम असेल तर ईव्हिएम काढून लढा. मी आत्ताच जरांगे पाटलांशी चर्चा केली आहे मराठा, मुस्लिम आणि दलित पक्ष स्थापन करणार आहोत, तर मनोज जरांगे मुख्यमंत्री आणि दिपक केदार गृहमंत्री होईल. हे काय चाललंय पाणी पाजताय आणि म्हणताय उपोषण सुटलं, लोकांना वेढ्यात काढताय. जरांगे पाटलांच्या विरोधात चिरगूटं उभे केले जातात, जे आरएसएस आणि बीजेपीचे हास्तक आहेत, बावनकुळे यांचा फोन येतो आणि आंदोलन मागे घेता, कारण तुम्ही त्यांचेच हस्तक आहात. मनोज जरांगेच्या जिवित्वाला जर काही झालं तर त्यास सरकार जबाबदार राहणार असा इशाराही दिपक केदार यांनी यावेळी दिला.


ओबीसी नेते अ‍ॅड. मंगेश ससानेंचे लाक्षणीक उपोषण : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस, प्रकृती खालवल्याने मराठा आंदोल आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे ओबसी नेते अ‍ॅड. मंगेश ससाणे यांनी आंतरवाली शिवारात दलित वस्तीमध्ये ओबीसी हक्काच्या मागण्यांसाठी सहकार्‍यांसमवेत लाक्षणीक उपोषण सुरू केले आहे. कुठलाही गाजावाजा न करता मंगेश ससाणे सहकार्‍यांसमवेत आंतरवाली (सराटी) शिवारात दाखल झाले आणि सकाळी 10:30 पासून आंदोलन सुरू केले आहे. माध्यमांशी बोलताना आंदोलक ससाणे म्हणाले की, ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यात येत आहे, सरकार सातत्याने जरांगेचे लाड पुरवत आहे. सरकारचे मंत्री आंतरवालीत पायघड्या घालत आहे. आंतरवालीकडे मंत्र्यांच्या गाड्या वळतात त्यामुळे आम्ही सरकारच्या मंत्र्यांच्या गाड्यांचे इंधन वाचवावे म्हणून आम्ही इथं आंदोलन सुरू केलं आहे.


एका जिल्हाकिधारी महिलेसमोर शिव्या दिल्या जातात, विखे पाटील जरांगे पाटील की जय म्हणतात. चाललंय काय या महाराष्ट्रात आमच्या 22 ओबीसी बांधवांनीही आत्महत्या केल्या आहेत, त्यांना आर्थीक मदत द्या, त्यांच्याही कुटुंबतील सदस्यांना नोकरीत सामावून घ्या. यापूर्वी दोन वेळा याच ठिकाणी दलित वस्तीवर आंदोलन केलं होतं. मंत्र्यांच्या गाड्या याच मार्गाने आंतरवालीत दाखल होत आहेत आम्हाला पाहायचं आहे की आता मंत्री ओबीसींच्या आंदोलनाकडे वळतात का? आता आमचं हे लाक्षणीक उपोषण आहे लवकरच आमचंही उपोषण बेमुदत सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला.

Comments


bottom of page