top of page

आंदोलनाला मदत मिळते कुठून?, जरांगे पाटलांनी सांगूनच टाकलं!



मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभारल्यापासून मोठ मोठ्या सभा अगदी (गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाली अशा) बैठकां यासह आंदोलनासाठी लागणार्‍या खर्चावरून वारंवार राजकिय नेत्यांकडून रसद पुरवल्याचे आरोप करण्यात आले. ज्यामध्ये कधी शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे यांची नावे पुढे करण्यात आली. याशिवाय अलिकडे तर सत्ताधारी आमदारांवरच आरोप करण्यात येत आहेत. याबाबत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मला मदत मिळते गरिब ती गरिब मराठ्यांकडून असं प्रत्यूत्तर देत टीकाकारांना चांगलीच चपराक दिली आहे.


मनोज जरांगे पाटील यांचे आदोलनाची व्याप्ती पाहता त्याची तुलना कुठल्याच मोलानेे होवू शकत नाही. स्वयंपुर्ती, भावना, उत्साह, जोष आणि आनंदाचा संगम या आलोट गर्दीत रुपांतरीत होतो. ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ या शिर्षकाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सातत्याने राजकीय लोकांकडून रसद पुरवली जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.


नुकताच आमदार प्रकाश सोळंके यांनी दहा लक्ष रुपये दिल्याचा अरोप करण्यात आला. यावर दस्तुरखुद्द आमदार प्रकाश सोळंके यांनीच माध्यमांसमोर येत मनोज जरांगे पाटील हे लढाड आणि प्रेरणादाइ नेतृत्व आहे. त्यांच्या आंदोलनासाठी मदतीची इच्छा आहे पण मदत मागायला कोणी येतच नाही. असा खुलासा करत टीकाकारांचा दावा खोडून काढला.


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना हा प्रश्न विचाला असता पाटील म्हणाले की, आरोप करणारे काही म्हणतात आगोदर शरद पवार, त्यानतर एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही मतदीचे आरोप करण्यात आले. मी तुम्हाला खरं सांगतो मला मदत मिळते ती गरिब मराठ्यांकडून असं म्हणत जरांगे पाटील यांनी टीकारांच्या आरोपांना जोरदार चपराक लागावली.

Comments


bottom of page