top of page

आता तुकाराम मुंडे यांची बदली केली तर... - जरांगे पाटील

धाराशीव: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यापासून नागरीकांच्या अरोग्याचा खेळमांडणार्‍या राज्यात दुध भेसळ, प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला त्याच बरोबर मानवी आरोग्यास हानीकारक औषधींचा कोट्यावधींचा साठा जप्त करत धडाकेबाज कारवायांनी शेकडो गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना अटक केली आहे. राज्यभरातून तुकाराम मुंडे यांच्या धाडसी कारवायांचे कौतुक होत असून सामांन्यातून त्यांना समर्थन मिळत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनीही आता तुकाराम मुंडेंच्या कार्याचे कौतुक करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धाडसी कारवायांनी राज्यभरतील भेसळखोरांसह गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. मागील कित्तेक वर्षापासून अन्न व औषध सुरक्षा विभाग अस्तित्वात आहे की, नाही? असा प्रश्न सामान्यांना पडला होता. मात्र, मागील महिण्यात आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएचा कार्यभार घेताच राज्यात दुध संकलनामध्ये प्रथमक्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात धाडसी कारवायाने भेसळयुक्त दुधाचा पर्दाफास केल्याने जिल्ह्यातील संकलन जवळपास 25 टक्यांनी घटले. तुकाराम मुंडे यांच्या कारवायांमुळे राज्यातील भेसळयुक्त दुध संकलन रोखल्याने संकलानाची टक्केवारी घटली आहे.


युरीया, रसायनयुक्त केमीकल, पामतेलासारख्या घातक रसायणांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणार्‍या भेसळखोरांच्या मुसक्या आवळल्याने भेसळयुक्त दुध संकलनातून हद्दपार होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दुधाची खरी किंमत उजेडात येत आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याच्या पदार्थांनाही बाजारात चांगलीच चपराक बसल्याचे चित्र आहे. मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या औषधी बाबत पिंपरी चिंचवड येथील नामांकीत औषध निर्माण कंपनीसह, प्रसिद्ध पतंजलीच्या स्टोआरवरही तुकाराम मुंढे यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. एफडीएच्या धाडसी कारवाईमुळे शेतकर्‍यांच्या दुधाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.


सर्वसामान्यांतून तुकाराम मुंडे यांचे कौतुक केले जात असले, तरी कायम बदलीच्या फेर्‍यात अडकलेल्या तुकाराम मुंडे यांची शासन स्तरावरून बदली केली जाऊ शकते? असा सुर उमटत आहे. त्यातच आता मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी तुकाराम मुंडे यांच्या कारवायांचे कौतुक करत ‘ आता जर तुकाराम मुंडे यांची बदली केली, तर असा मागे लागेल की बघत रहा’ सरकारला असे खडे बोल सुनावत इशारा दिला आहे. कळंब (जि. धाराशीव) मार्गे पंढरपूरकडे जात असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

Comments


bottom of page