सोलापुरमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाहून परणार्या भाविकांची पिकअप विहीरीत कोसळली, रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत पिकअप कोसळून आठ जणांचा मृत्यू
- Navnath Yewale
- 20 hours ago
- 1 min read

सोलापूर: जिल्ह्यातील माळशीरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला ती विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने या अपघातात आठ जणांना अपाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेत ज्याचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदीतीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील तांदळवाडी (ता. माळशीरस) येथे एक वाहन खासगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मतद राज्य सरकारकडून देण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून गावाकडे परतत असताना तांदळवाडी (ता. माळशीरस) येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत हे पिकअप कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सर्व मयत राहणार रांजणी गावातील आहेत. तर सात जणांनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.



Comments