आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शासकिय आश्रमशाळेचा शुभारंभ
- Navnath Yewale
- Jul 31
- 1 min read
रानशेत येथे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार राजेंद्र गावित, अप्पर आयुक्त गोपिचंद कदम यांच्या हस्ते उद्धाटन

डहाणू :कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व निवासी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रानशेत (महालक्ष्मी गड पायथ्याशी) येथे नवी शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात आली असून, तिचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
ही शाळा पूर्वी वसई तालुक्यातील खर्डी येथील बंद झालेल्या आश्रमशाळेच्या पुनर्संचयनेच्या अनुषंगाने सुरु करण्यात आली आहे. या नव्या शाळेचे उद्घाटन राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) मा. विवेक पंडित यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या समारंभाला पालघरचे आमदार मा. राजेंद्र गावित, अप्पर आयुक्त (आदिवासी विकास) ठाणे गोपीचंद कदम, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, तसेच शूर झलकारी कातकरी एकता महासंघाचे अध्यक्ष रमेश सवरा, कातकरी संघटनेचे राज्य सचिव शांताराम ठेमका, कार्याध्यक्ष सिलिंग लहांगे, डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित, संतोष घाटाळ, काळुराम घाटाळ, दिलीप पवार, सुरेश भोये, अनिस मिशाळ, ग्रामसेवक काशिनाथ जाधव, व इतर मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेची वैशिष्ट्ये शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत सुरु करण्यात आली आहे.प्रारंभी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालवले जाणार आहेत.निवासी वसतीगृह व सर्व शैक्षणिक सुविधा या शाळेत उपलब्ध आहेत.ही शाळा भाडे कराराने घेतलेल्या इमारतीत, रानशेतच्या शांत, निसर्गरम्य परिसरात सुरु करण्यात आली आहे.कार्यक्रमात बोलताना विवेक पंडित यांनी सांगितले की, “ही शाळा म्हणजे कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपली मुले या शाळेत दाखल करावीत.स्थानिक गरज ओळखून निर्णय डहाणू व तलासरी परिसरात कातकरी समाजाची घनवस्ती लक्षात घेता, सामाजिक संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही शाळा याच परिसरात सुरु करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी समारोपप्रसंगी सर्व मान्यवर पाहुणे, पालक आणि सामाजिक संघटनांचे मन:पूर्वक आभार मानले.



Comments