top of page

अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा विमा मंजूर; कुटुंबीयांना मिळणार आर्थिक आधार

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातात त्यांचे अंगरक्षक पीएसओ विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जाधव कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. कारण पोलिस दलात कार्यरत असलेला त्यांच्या घरातील कर्ता पुरुष अशा प्रकारे त्यांना सोडून गेला होता.पण विदीप जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विमा पॉलिसीमुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. हा विमा मंजूर झाल असून त्याची रक्कम ही कोट्यावधी रुपये आहे. त्यामुळं विदीप जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यास ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.


दरम्यान, विदीप जाधव हे मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. शासनाकडून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेची जाबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यामुळं ते अजितदादांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अजित पवारांचा कुठेही दौरा असला की विदीप जाधव हे त्यांच्यासोबत त्यांच्या सावलीसारखे असत.2009 मध्ये ते मुंबई पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर 2014 पासून 2019 या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरक्षा पथकात काम पाहिलं. त्यानंतर 2019 पासून ते अजित पवारांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम पाहू लागले. पण दुर्दैवानं बारामतीकडं अजित पवारांना घेऊन निघालेल्या विमानाल भीषण अपघात झाला आणि त्यात पवारांसह विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला.


विदीप जाधव यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा विमा काढला होता. इतक्या मोठ्या रकमेचा विमा काढण्यामागे त्यांचं धोकादायक काम हे कारण असू शकतं. सातत्यानं व्हीआयपी लोकांसोबत विमान प्रवास किंवा त्याच्या सुरक्षेवेळी स्वत: आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्यानं त्यांनी इतक्या रक्कमेचा विमा काढला असावा, अशी चर्चा आहे. त्यामुळं तृत्यूनंतर आता विमान कंपनीनं त्यांचा 1 कोटी 5 लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. यामुळं विदीप जाधव यांच्या जाण्यानंतरही या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळाला आहे. विदीप जाधव यांच्या मागे त्यांच्या पत्नी, दोन मुलं (मुलगा, मुलगी) आई-वडील असा परिवार आहे.

Comments


bottom of page